संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी देणारा पुण्यातून ताब्यात


पुणे–शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. राहुल तळेकर (वय 23) असे या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील गुन्हे शाखेने काल रात्री रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील खराडी परिसरातील जयशंकर हॉटेलमधून ताब्यात घेतलं.

मुंबई पोलिसांनी माहिती दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्काळ या प्रकरणी कारवाई करत लगोलग या तरुणाला ताब्यात घेत मुंबई पोलिसांच्या ताब्यात सोपवलं.

संजय राऊत यांना शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याचा मॅसेज करण्यात आला. यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांना माहिती दिली. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्याप्रमाणेच दिल्लीत संजय राऊतांचीही हत्या करण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली. याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी राहुल तळेकर या २३ वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले आहे. हा तरुण एका हॉटेलमध्ये काम करत असल्याचे चौकशीत समोर आले. त्याने संजय राऊतांना असा मॅसेज का केला? त्याला असे करण्यास कोणी सांगितले का? याबाबत मुंबई पोलीस अधिक तपास करीत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  संजय राऊत,आधी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करा- चंद्रकांत पाटील