The news that NCP (Sharad Chandra Pawar) is going to merge with the Congress party has created excitement in the political circles.

#NCP (Sharad Chandra Pawar): राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) कॉँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

NCP (Sharad Chandra Pawar) : पुण्यातील (Pune) शरद पवारांचे(Sharad Pawar)   निवासस्थान असलेल्या मोदी बागेत(Modi Baug) राष्ट्रवादी काँग्रेसच्या(शरदचंद्र पवार)( NCP (Sharad Chandra Pawar) वरिष्ठ नेत्यांची बैठक होती. या बैठकीला पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule), अमोल कोल्हे(Amol Kolhe), यांच्यासह सर्व आजी-माजी आमदारांचीही उपस्थिती होती. या बैठकीदरम्यान अचानक राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) कॉँग्रेस(Congress) पक्षात विलीन होणार असल्याचे वृत्त वाहिन्यांवर झळकले आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मात्र, आमचा पक्ष शरद पवार आहे. आमचं चिन्ह शरद पवार आहे. त्यांच्याच नावावर आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. त्यामुळे आमचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या बातम्या म्हणजे केवळ अफवा आहेत, असं सांगत शहराध्यक्ष प्रशांत जगताप(Prashant Jagtap) यांनी या चर्चेला विराम दिला. (The news that NCP (Sharad Chandra Pawar) is going to merge with the Congress party has created excitement in the political circles)

ही तर पवार नावाची भीती

आज सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या बातमीने राज्यासह देशात खळबळ उडाली होती. मात्र, चुकीची बातमी पेरली गेल्याचं शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. याबातमीत काहीही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. पवार नावाची भीती वाटत असल्याने अशा बातम्या पेरल्या जात आहेत, असा पलटवार प्रशांत जगताप यांनी केला.

अनिल देशमुख यांनीही फेटाळली शक्यता

दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेस(शरदचंद्र पवार) गटाचे नेते अनिल देशमुख यांनी पक्ष विलीन करण्याच्या बातम्या फेटाळल्या. आम्ही काँग्रेसमध्ये विलिन होणार ही बातमी पेरण्यात आली. या बातमी कोणतंही तथ्य नाही. आम्ही काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही तीन पक्ष मिळून एकत्र काम करू. आम्हाला लवकरात लवकर चिन्ह मिळाव यासाठी आम्ही आग्रही आहोत, असं अनिल देखमुख म्हणाले.

शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनीही या बातमीवर प्रतिक्रिया दिली. अशा प्रकारच्या कोणत्याही मुद्द्यावर आमच्या बैठकीत चर्चा नाही. आम्ही आगामी निवडणुकीवर चर्चा केली. आमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रश्नच येत नाही. या सगळ्या अफवा कोण पसरवतं आहे. हे बघितलं पाहिजे, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

इंडिया’ आघाडीचा पुण्यात मेळावा

दरम्यान, येत्या २४ फेब्रुवारी रोजी  पुण्यात ‘इंडिया’ आघाडीचा पहिला मेळावा होणार आहे, अशी माहिती पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. तसेच शरद पवार गट नवे नाव आणि नवे चिन्ह घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *