What did the brother achieve even though he was fitur?

फितूर होऊन तरी भावाने काय मिळवलं?

पुणे-मुंबई राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)—बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदार संघात महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे(Supriya Sule) आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) या नणंद-भावजय मध्ये लढत होत असताना त्याच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबियांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप(Prashant Jagtap) यांनी खासदार सुप्रिया सुळे, शरद पवारांचा (Sharad Pawar) एक फोटो पोस्ट करत अजित पवारांवर टीका केली आहे.

काय म्हणाले प्रशांत जगताप त्यांच्या पोस्टमध्ये?

“जवळपास ५० वर्षे भावाला आपुलकीनं राखी बांधली, भाऊबीजेला मायेने ओवाळलं. भावाकडून रक्षा करण्याचं वचन घेतलं अन् त्या वचनावर भाबडेपणानं विश्वासही ठेवला. पण.. एक दिवस कुटुंबावर शत्रुची सावली पडली.. भाऊ फितूर झाला, स्वार्थासाठी शत्रूला जाऊन मिळाला. शत्रूही असा कपटी अन् अहंकारी… की ज्याला स्वतःला जिंकता आलं नाही तरी चालेल, पण केवळ आपल्या बापाला हरवायचंय. भाऊ शत्रूला जाऊन मिळाला… पण का? तेच कळेना… काय हवं होतं या भावाला? काय द्यायचं बाकी होतं? जीवापाड प्रेम दिलं, माया दिली, सर्व चुकांवर पांघरून घातलं… काय द्यायचं बाकी होतं? बरं.. फितूर होऊन तरी भावाने काय मिळवलं?” असं प्रशांत जगताप पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *