#खुशखबर-मान्सून केरळात दाखल : महाराष्ट्रात या तारखेला होणार आगमन


पुणे— हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) केरळमध्ये नियोजित वेळापत्रकाच्या दोन दिवस अगोदर ( दि. 29 मे) म्हणजे आज केरळमध्ये दाखल झाले आहे. विशेष म्हणजे मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी असलेली अनुकूल परिस्थिति बघता त्याचे  महाराष्ट्रात 5 जूनपर्यंत आगमन होणार असल्याची आनंदवार्ता हवामान विभागाने दिली आहे.

श्रीलंकेच्या वेशीवर काही दिवस मान्सूनचा मुक्काम वाढला होता परंतु तो गुरुवारी पुन्हा सक्रिय झाला होता. 1-2 दिवसात त्याचे केरळात आगमन होईल असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला होता.  आता मान्सून केरळात दाखल झाला असून 5 जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होवू शकते असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. 27 जून पर्यंत केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता पण त्यापेक्षा आधी मान्सूनचे आगमन झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. त्याआधी 1 जूनला केरळमध्ये मान्सूनमध्ये दाखल होत असतो पण यावर्षी मान्सूनचे लवकर आगमन झाले आहे.

अधिक वाचा  अद्वैत सिद्धांताची भक्कम पायावर उभारणी करणारे आद्य श्री शंकराचार्य

केरळात मान्सून दाखल झाल्यावर सात दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होत असतो. महाराष्ट्रातील तळकोकणात पहिल्यांदा मान्सून दाखल होत असतो. त्यानंतर तीन ते चार दिवसांत मुंबईमध्ये मान्सून दाखल होत असतो. 10 ते 11 जूनच्या सुमारास साधारण मुंबई आणि पुण्यात दाखल होत असतो पण यावर्षी 7 ते 8 जूनला पुण्यात आणि मुंबईत मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love