#दिलासादायक : मान्सून वेळेअगोदरच केरळमध्ये पोहचणार


पुणे–नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) मंदावलेली वाटचाल गुरुवारी (ता. २६) पुन्हा सुरू झाली आहे. अरबी समुद्रात दाखल झाल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी मॉन्सूनने पुढे चाल करत श्रीलंकेत गुरुवारी मान्सून दाखल झाला. तर आज केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. सध्या केरळमध्ये अनेक ठिकाणी मुसळदार पाऊस होत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

श्रीलंकेच्या निम्म्या भागासह, अरबी समुद्र, मालदीव, कोमोरिन भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सूनने प्रगती केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होणार माहिती हवामान विभागाने दिली आहे. केरळमध्ये 1 जूनच्या आधी मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. मान्सूनची वाटचाल जूनच्या सुरुवातीला धीम्या गतीने राहणार आहे.

अधिक वाचा  पंतप्रधान मोदींनी पहीली ५ वर्षे काँग्रेस काळातील प्रकल्पांची उद्घाटणे व लोकार्पण करण्यातच घालवली - गोपाळदादा तिवारी

मॉन्सून या वर्षी अंदमानच्या दक्षिण समुद्रात वेळेआधी दाखल झाला. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने शनिवारपर्यंत (ता. २८) दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप बेटे आणि कोमोरीन समुद्राच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा मॉन्सून २७ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविली होती. केरळातील आगमनात चार दिवसाची तफावत होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली होती.

दरम्यान, अरबी समुद्रात मागील काही दिवस मान्सून रेंगाळला असून आता तो पुढे सरकला आहे. सध्या मान्सूनला पुढच्या वाटचालीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनचा प्रवास असाच पुढे सुरू राहिला तर मान्सून पुढील आठवडाभरात राज्यात आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love