मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन: तळकोकणात पावसाला सुरुवात, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन
मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन

पुणे(प्रतिनिधी)–राज्यातील बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांची प्रतीक्षा अखेर संपली असून नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनने शनिवारी ( ६ जून २०२) महाराष्ट्रात अधिकृतपणे प्रवेश केला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने संपूर्ण गोवा व्यापल्यानंतर आता तळकोकणात आपली हजेरी लावली असून, यामुळे राज्याला तीव्र उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे.

हवामान खात्याने आज जाहीर केलेल्या माहितीनुसा मान्सूनने अरबी समुद्राच्या आणखी काही भागांसह संपूर्ण गोवा राज्य आणि महाराष्ट्रातील दक्षिण कोकणच्या काही भागांमध्ये धडक दिली आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर मान्सूनने कर्नाटकचा मोठा भाग, आंध्र प्रदेशचे काही भाग आणि तामिळनाडूचा बहुतांश भाग आज पूर्णपणे व्यापला आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत मान्सूनने ईशान्य भारतातील मणिपूर आणि मिझोरम या राज्यांमध्येही अधिकृत प्रवेश केला आहे.

अधिक वाचा  भारलेल्या वातावरणात कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला लाखो भीमसैनिकांकडून मानवंदना

तळकोकणात मान्सून दाखल झाल्यामुळे आता पुढील काही दिवसांत मुंबई, ठाणे आणि उर्वरित महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्यासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. साधारणपणे तळकोकणात आगमन झाल्यानंतर मान्सून वेगाने उत्तर कोकण आणि मुंबईच्या दिशेने वाटचाल करतो. त्यामुळे मुंबईकरांनाही लवकरच पावसाचा आनंद घेता येणार आहे. या प्रवासादरम्यान काही ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

यंदा मान्सूनचे आगमन सरासरी वेळेपेक्षा तीन दिवस उशिरा म्हणजेच ४ जून रोजी केरळमध्ये झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही प्रगती थोडी वेगळी आहे; गेल्या वर्षी मान्सून २४ मे रोजी केरळमध्ये आणि २५ मे रोजी तळकोकणात दाखल झाला होता, तर २६ मे रोजीच त्याने मुंबई गाठली होती. यावर्षी मात्र जून महिन्यात एकूण पर्जन्यमान सरासरीपेक्षा काहीसे कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे, त्यामुळे मान्सूनची पुढील वाटचाल कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा  समरसता हा भाषणाचा नाही तर आचरणाचा विषय आहे

हवामान विभागाने कोकण, गोवा आणि लगतच्या भागात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः ६ आणि ७ जून रोजी केरळमध्ये ‘अत्यंत मुसळधार’ पावसाची शक्यता असल्याने तेथे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची वेळ असून, मान्सूनच्या आगमनामुळे हवामान खात्याने त्यांना शेतीच्या कामांना गती देण्याचा सल्ला दिला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love