करीनाने दिला दुसऱ्या मुलाला जन्म:सोशल मिडियावर ‘औरंगजेब’ असे नामकरण


पुणे -प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena kapoor Khan ) पुन्हा आई झाली आहे. तीने पुन्हा एका मुलाला जन्म दिला आहे. रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. मात्र, पुन्हा एकदा करीनाची आई होण्याची बातमी सोशल मीडियावर येताच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी (यूजर्स) करिना आणि सैफला ट्रोल केले आहे आणि त्यांच्या दुसर्‍या मुलाचे नामकरणही केले आहे. वापरकर्त्यांनी तैमूरचा भाऊ औरंगजेब असे नाव ठेवले आहे.

एका यूजर्सने टिप्पणी करताना लिहिले आहे की, अभिनंदन, तैमूरनंतर आता औरंगजेबचा जन्म झाला आहे. दुसर्‍या यूजर्सने लिहिले आहे ,औरंगजेब आला. सोशल मीडियावर तैमूरविषयीही मिम्स बनवले जात आहेत.

अधिक वाचा  गोवा लघुपट महोत्सव:‘पेनफूल प्राईड’ ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट

 एका यूजर्सने लिहिले आहे, सैफ आणि करीना, तैमूर नंतर तुम्ही आपल्या मुलाचे नाव औरंगजेब किंवा बाबर काय ठेवणार आहात ..? एकाने लिहिले आहे,  तैमूरनंतर करिना कपूर खानने औरंगजेबला जन्म दिला आहे.  सोशल मीडियावर नावावरून ट्रोल होण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. मात्र, करीना आणि सैफसुद्धा या ट्रोलना वेळोवेळी प्रतिसाद देत असतात.

दुसर्‍या मुलाचे नाव सांगण्याबद्दल काही दिवसांपूर्वी करीना कपूर म्हणाली होती, ‘तैमूरच्या नावावरून झालेल्या वादानंतर मी आणि सैफ अली खानने याक्षणी याबद्दल विचार केलेला नाही, आम्ही याचा शेवटपर्यंत विचार करू आणि मग सर्वांना ‘सरप्राइज’ देऊ.   

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love