अन्यथा राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा: उद्यापासूनधार्मिक,राजकीय,सामाजिक,सरकारी कार्यक्रमांना बंदी


मुंबई- राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना मास्क घाला,शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा असे सांगत राज्यात कोरोनाची  दुसरी लाट धडका मारत असल्याने अनेक गोष्टींवर पुन्हा बंधने घालण्याची घोषणा केली आहे. उद्यापासून धार्मिक,राजकीय,सामाजिक, सरकारी कार्यक्रमांना, गर्दी करणाऱ्या मोर्च्यांवर बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट आली की नाही हे येत्या 8-15 दिवसांमध्ये कळेल असेही त्यांनी सांगितले. आठ दिवसात परिस्थितीचा आढावा घेऊन पुन्हा लॉकडाऊनचा करायचा का नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल असा इशाराही ठाकरे यांनी दिला.  

सत्ताधारी पक्षांबरोबरच विरोधी पक्षांना गर्दी टाळण्यासाठी आवाहन करताना ठाकरे यांनी पक्ष वाढवण्याचा सर्वांना अधिकार आहे, मलाही माझा पक्ष वाढवायचा आहे परंतु, सर्वांना विनंती आपण पक्ष वाढवू,कोरोना वाढवायला नको असे सांगत राजकीय कार्यक्रम घेऊ नका असे आवाहन केले आहे.

अधिक वाचा  लवकरच राज्यातील कोरोना नियम शिथिल करणार - अजित पवार

मी जबाबदार मोहीम

जनतेला आवाहन करताना ठाकरे म्हणाले, कोरोनाचे पुन्हा वाढलेले संकट तळायचे असेल तर संपर्क कमी करण्याची आवश्यकता. संपर्क थांबवला तर संसर्ग थांबेल लग्न सोहळ्यातील गर्दी कमी करा, मास्क वापरा, सॅनीटायजरचा वापर करा असे सांगत कडक नियम पाळावेच लागतील असे सांगितले. लॉकडावूनच्या काळात ज्याप्रमाणे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबवली त्याप्रमाणे आता सर्वांनी ‘मी जबाबदार’ मोहीम राबवावी’ आणि स्वत: शिस्त पाळावी असे आवाहन त्यांनी केले.

अर्थचक्राला गती द्यायची तर कोरोनाचे संकट पुन्हा वाढले आहे. जवळजवळ 7 हजार नवीन रुग्ण वाढले आहेत.  15 दिवसांपूर्वी हीच संख्या अडीच हजार होती त्यामुळे कोरोना गेला असे वाटत होते. कोरोना काळात कोरोना योध्यांनी उत्तम काम परंतु, अनेकांनी त्यांचे स्वत:चे जीवन, कुटुंब संकटात टाकून सेवा केली. काहींनी त्यांचे आयुष्य गमावले. आता आणखी कोविड योध्ये निर्माण होऊ देऊ नका कोविड योध्याचा सत्कार करताना तुम्ही कोविडदूत होऊ नका, कोविड योध्यांचे बलिदान वाया घालवू नका, असेही आवाहन त्यांनी जनतेला केले.  

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love