भाजप पुणे शहर महिला मोर्चाच्या आयटी सेलच्या प्रमुखपदी सौ.कल्याणी खर्डेकर यांची नियुक्ती

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- भारतीय जनता पार्टी पुणे शहर महिला मोर्चाच्या आयटी सेलच्या प्रमुख पदी सौ.कल्याणी खर्डेकर यांची नियुक्ती केल्याची घोषणा महिला मोर्चा अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी केली.यावेळी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक व इतर मान्यवर उपस्थित होते.सौ.कल्याणी खर्डेकर प्रतिष्ठित आयटी कंपनीत senior business analyst पदावर कार्यरत असून त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून ( COEP ) बी टेकची पदवी प्राप्त केली आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील,शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक आणि महिला मोर्चा अध्यक्ष अर्चना पाटील यांनी मला जी संधी दिली त्याचा मी आय टी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पूरेपूर उपयोग करेन व आय टी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना संघटित करण्यावर भर देइन असे कल्याणी म्हणाल्या.प्रामुख्याने कोरोना काळात वर्क फ्रॉम होम करताना येणाऱ्या अडचणी,आरोग्यविषयक तक्रारींसाठी शिबीर आयोजित करणे,मानसिक त्रासावर व कौटुंबिक समस्यांवर समुपदेशन,बहुराष्ट्रीय कंपन्यां कडून सुरक्षिततेची हमी मिळविण्यासाठी प्रयत्न,रात्रपाळीतील कर्मचाऱ्यांच्या अडचणी अश्या विविध विषयांवर मी प्राधान्याने काम करणार असल्याचे ही त्या म्हणाल्या. आय टी क्षेत्राबद्दल जागरूकता निर्माण करून स्त्री सशक्तीकरणाला बळ देण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी आयटी प्रकोष्ठची कार्यकारिणीही जाहीर केली

या कार्यकारिणीत मेघना लवळेकर, देवयानी नातू,अबोली चांडक,अधिका डोंगरे,अनघा जोशी,श्रुती देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *