मुंबई -अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक राजीव कपूर यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले.कपूर कुटुंबीयांना या धक्क्यातून सावरण्यासाठी बराच वेळ लागेल. राजीव कपूर यांच्या निकटवर्तीयांनी काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या. गेल्या अनेक वर्षांपासून राजीव कपूर हे त्यांचे जीवन आतल्या आत कुढत जगत होते आणि त्यांच्या मनातील काही गोष्टीबद्दल त्यांच्या अत्यंत निकट असलेल्या काहीजणांकडेच ते व्यक्त व्हायचे.
राजीव कपूर गेल्यानंतर त्याच्यापासून दूर असले तरी लोक त्याच्यात त्यांचे काका शम्मी कपूर याची झलक असल्याचे पुन्हा पुन्हा सांगताना दिसतात.
चित्रपटांमध्ये बराच काळ घालवल्यानंतर राजीव आपल्या अलीकडच्या काळात चित्रपट आणि माध्यमांच्या वलयापासून दूर होते. राजीव यांनी एका मुलाखतीत राज कपूरचा भाऊ आणि त्यांचे काका शम्मी कपूर यांच्या बर्याच आठवणी सांगितल्या होत्या. त्यांनी सांगितले होते की ते शम्मी कपूर यांच्याबरोबर मासेमारीला जात असे. काश्मीरच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले होते की ते एकदा काका शम्मी कपूर यांच्या समवेत काश्मीरच्या तळ्यात मासे पकडण्यासाठी गेले होते.
राजीव हे काका शम्मी कपूर यांची प्रशंसा करणाऱ्यांपैकी एक होते. राजीव लहानपणी शम्मी कपूरच्या फॅशनविषयी, त्याची आयात केलेली वाहने यांच्या कहाण्या ऐकत मोठे झाले. शम्मी कपूर यांचा चेहरा आणि अभिनयाने रसिकांच्या मनात अजूनही घर केले आहे. परंतु, त्याच कारणांमुळे इतर कोणी नाही तर त्यांचा स्वत:चा पुतण्या राजीव कपूर चिंतित होते.
राजीव कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, काका शम्मी कपूर यांच्या चेहऱ्याशी मिळता जुळता त्यांचा चेहरा असल्याने त्यांना अडचणींचा सामना कसा करावा लागला. खरं तर, राजीव कपूर यांचे बरेच चित्रपट जे त्यांना मिळाले त्यातील त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा या हुबेहूब शम्मी कपूर यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेतून प्रेरित होत्या. ते असे मानत की हे सर्व का होते तर केवळ त्यांचा चेहरा हा शम्मी कपूर यांच्या चेहऱ्याशी अत्यंत मिळताजुळता होता आणि त्यामुळेच त्यांना चित्रपटातील व्यक्तिरेखाही त्यांच्यासारख्याच मिळाल्या.
त्यांचे असे म्हणणे होते की, बर्याच चित्रपट दिग्दर्शकांनी शम्मी कपूर यांच्यासाठी बनवलेल्या व्यक्तिरेखांप्रमाणेच माझ्यासाठीही तशाच व्यक्तिरेखा बनवल्या. ते शम्मी अंकलबरोबर काम केलेले ते दिग्दर्शक होते,असेही ते म्हणाले होते. राजीव स्वत: त्याच्या काका शम्मी कपूर यांची ‘लाईफ स्टाइल’ आणि अभिनयाचे सर्वात मोठे चाहते होते, परंतु राजीव यांचे असे म्हणणे होते की शम्मी कपूर यांच्या आणि त्यांच्या चेहऱ्यातील साम्य असल्यामुळे ते काही नवीन करू शकले नाहीत आणि आपली क्षमता सिद्ध करू शकले नाही. तरुणपणी याबाबत आपली इतकी समज नसल्याने आपण व्यक्तिरेखांची योग्य निवड करू शकलो नाही असेही ते म्हणायचे .