काँग्रेसने आझाद आणि चव्हाण यांना काय दिले नाही? – संजय निरुपम

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे— ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली तर  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही नेतृत्वाला आत्मनिरीक्षण करण्याचा सल्ला देत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजय निरुपम यांनी काँग्रेसने आझाद आणि चव्हाण यांना काय दिले नाही ? असा सवाल उपस्थित केला आहे. पक्ष अडचणीत असताना पक्ष सोडणे किंवा नाराजी व्यक्त करून टीका करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

काँग्रेसचे नेते संजय निरुपम काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी काँग्रेस भवन येथे महिला बचत गटांचे विविध गणेशोत्सवांमधील डेकोरेशनचे तसेच महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. त्या प्रदर्शनाला प्रमुख पाहुणे म्हणून संजय निरुपम आज उपस्थित होते. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रसार माध्यमांची संवाद साधला.

निरुपम म्हणाले, देशात वेगवेगळ्या मुद्द्यावर बोलणारे सध्या कोणीही नाही. एकटे राहुल गांधी बोलत आहेत आणि राहुल गांधीच्या यांच्या नेतृत्वात काँग्रेस लढत आहे. त्यामुळे आझाद यांनी यावेळी काँग्रेस सोबत राहणार आवश्यक होतं. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो अभियानाला कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न यातून आझाद यांनी केला आहे अशी टीका काँग्रेस नेते माजी खासदार संजय निरुपम यांनी केली.

आझाद गेली ४२ वर्षे काँग्रेससोबत आहेते. त्यांना पक्षाने १० वर्ष लोकसभा, पाच वेळा राज्यसभा दिली. ते इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंहराव, डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. त्यानंतर त्यांना जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री करण्यात आले. त्यांना पक्षाने सर्व काही दिले. त्यांचा २०२१ मध्ये राज्यसभेतील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा पक्षाने संधी द्यावी, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, सर्व काही एकाच व्यक्तीला देणे शक्य नसते. आझाद यांना जे मिळाले ते काँग्रेसमुळेच मिळाले. ज्यांना आजवर काहीच मिळाले नाही, असे कोट्यवधी काँग्रेस कार्यकर्ते आहेत. आज पक्ष ज्या परिस्थितीतून जात आहे. अशा परिस्थितीमध्ये आझाद यांनी निस्वार्थ भावनेने इतर कार्यकर्त्यांसारखे पक्षासोबत उभे राहणे गरजेचे होते. मात्र, ते पक्षाचा राजीनामा देवून कार्यकर्त्यांची दिशा भरकटवण्याचे काम करत आहेत.

काँग्रेसने बाबांना काय दिले नाही ?

आझाद यांनी काँग्रेस सोडल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत टीका केली. आझाद यांच्यानंतर चव्हाणही काँग्रेस सोडणार का? या प्रश्नावर निरुपम यांनी आजवर काँग्रेस पक्षाने बाबांना काय दिले नाही? असा सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. त्यानंतर पक्षाने निरीक्षक म्हणून मोहन प्रकाश यांना पाठवले. त्यांनी चौकशी करून पक्ष श्रेष्ठींना अहवालही दिला आहे. पृथ्वीराज बाबांच्या प्रश्नाचे उत्तर लवकरच येईल, मात्र कारवाई होईल की नाही, हे आम्ही सांगू शकत नाही. मात्र काहीना काही कारवाई होईल, असेही निरुपम म्हणाले.

भाजपचा ईडी मोर्चा

एखाद्या राजकीय पक्षामध्ये युवा, महिला आघाडी असते. तसेच भाजपमध्ये युवा मोर्चा, महिला मोर्चा आहे. त्यात आता ईडी मोर्चा नव्याने स्थापन झाला आहे. जेथे विरोधी पक्षांचे सरकार आहे, ते पाडण्यासाठी, नेत्यांना धमकावण्यासाठी ईडी मोर्चाचा वापर केला जातो. सध्या तर ईडी म्हणजे किरीट सोमय्या आणि सोमय्या म्हणजे ईडी हे आता सामान्य नागरिकही बोलू लागले आहेत, असे ते म्हणाले.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *