पुणे- ओबीसी आरक्षणाला धक्का लावून मराठा समाजाला समाधान मिळणार नाही, मराठा आरक्षण असो किंवा इतर विषय, महाविकास आघाडी सरकार अभ्यास करत नाही, सल्ला घेत नाही, हम करेसो कायदा सारखं वागते आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. दरम्यान, मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर पडायला तयार नाहीत याचा पुनरुच्चार करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला....
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—भाजपचा मुकाबला करण्यासाठी कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी हे सौम्य हिंदुत्वाचा अंगीकार करत असल्याचा आरोप होत असताना कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, लेखक तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी पक्षाला आणि पक्षनेतृत्वाला चेतावणी दिली आहे. कॉंग्रेसने ‘भाजपा लाइट’ (भाजपचे दुसरे रूप) बनण्याचा प्रयत्न केल्यास कॉंग्रेस पक्षच संपून जाईल असे सूचक वक्तव्य थरूर यांनी केले आहे.
जळगाव- माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात झाला. अमळनेर येथील कार्यक्रम उरकून जळगावकडे जाताना त्यांच्या गाडीचे टायर फुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने खडसे यांच्यासह गाडीतील सर्वजन सुखरूप आहेत. खडसे यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.https://twitter.com/EknathGKhadse/status/1322892109322416129?s=20भाजपमधून खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख...
माणसाला भविष्यकाळाचा वेध घ्यायला आवडते. भविष्यात काय होणार याची उत्सुकता प्रत्येकाला असते, याच उत्सुकतेमुळे ज्योतिष शास्त्र Astrology जन्माला आले. मानवाने ग्रहांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यांचा मानवी जीवनात घडणाऱ्या घटनांवर कोणता प्रभाव पडतो ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला. हातापायाच्या रेषांवरून भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला. शकुन, अपशकुन, स्वप्न यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. नंतर ग्रहांबरोबरच अंकांचा आपल्या आयुष्यावर...
मुंबई- राष्ट्रवादीमध्ये नुकताच प्रवेश केलेले भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यातील वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीतर्फे राज्यपाल नामनिर्देशित आमदार म्हणून विधान परिषदेसाठी खडसे यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा असतानाच अंजली दमानिया यांनी थेट राज्यपालांना पत्र दिले आहे. खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे असलेले आरोप आणि त्यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशाच्यावेळी वापरलेली भाषा बघता...
पुणे-मुंबई
ओयो हॉटेल्स अँड होम्स च्या सॅनिटाइज्ड बिफोर युअरआईज साठी बॉलिवुड अभिनेता सोनू सूद ब्रँड अँबॅसेडर
News24Pune -
पुणे- भारताची अर्थव्यवस्था आता वेग घेत आहे आणि एका नव्या अर्थाने व्यवसायाची क्षेत्रे खुली होत आहेत. पर्यटन क्षेत्रातील नवे प्रवाह आणि ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा यांचा मागोवा घेऊन ओयो हॉटेल्स अँड होम्सने युनिलिव्हरच्या सहकार्याने ‘सॅनिटाइज्ड स्टे’ हा स्वच्छता आणि आरोग्य राखण्यासाठीचा उपक्रम आयोजित केला. त्यानंतर कंपनीने हाती घेतलेल्या स्वच्छता पद्धतीचे प्रात्यक्षिक ग्राहकांना दिसावे म्हणून, महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या आणि ओयो हॉटेलचा सदस्य...














