gtag('js', new Date());
पुणे--मावळ तालुक्यातील ढाक भैरीच्या कड्यावरून सुमारे 200 फुट खोल दरीत पडल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.प्रचिकेत भगवान काळे (वय 32 पिंपरी चिंचवड) असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ढाक भैरी येथील गुहेतून खाली उतरतत असताना हात सटकल्याने तो अंदाजे 200 फुट खोल दरीत पडला होता. त्याच्या हाताला व डोक्याला...
कोल्हापूर- विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त Governor appointed आमदारांच्या 12 जागांवरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांकडून कोणाचे नाव या 12 जणांच्या यादीत आहेत, ही अद्याप गुलदस्त्यात आहे तर दररोज राज्यपाल नियुक्त आमदार होण्यासाठी कोणाला संधि मिळणार याबाबत अनेक नावांचीही चर्चा सुरू आहे. ही सुरू असतानाच राज्य सरकारकडून देण्या त येणार असलेल्या नावांबाबत...
मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोट्यवधी जनतेच्या सदिच्छा, कार्यकर्त्यांची प्रार्थना तसंच उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सपोर्ट स्टाफच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.माझी प्रकृती उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील आणखी काही दिवस घरीच विलगीकरणात राहणार...
पुणे- ओबीसी आरक्षणाला धक्का लावून मराठा समाजाला समाधान मिळणार नाही, मराठा आरक्षण असो किंवा इतर विषय, महाविकास आघाडी सरकार अभ्यास करत नाही, सल्ला घेत नाही, हम करेसो कायदा सारखं वागते आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. दरम्यान,  मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर पडायला तयार नाहीत याचा पुनरुच्चार करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला....
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—भाजपचा मुकाबला करण्यासाठी कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी हे सौम्य हिंदुत्वाचा अंगीकार करत असल्याचा आरोप होत असताना कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, लेखक तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी पक्षाला आणि पक्षनेतृत्वाला चेतावणी दिली आहे. कॉंग्रेसने ‘भाजपा लाइट’ (भाजपचे दुसरे रूप) बनण्याचा प्रयत्न केल्यास कॉंग्रेस पक्षच संपून जाईल असे सूचक वक्तव्य थरूर यांनी केले आहे.
जळगाव- माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात झाला. अमळनेर येथील कार्यक्रम उरकून जळगावकडे जाताना त्यांच्या गाडीचे टायर फुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने खडसे यांच्यासह गाडीतील सर्वजन सुखरूप आहेत. खडसे यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.https://twitter.com/EknathGKhadse/status/1322892109322416129?s=20भाजपमधून खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख...