gtag('js', new Date());
पुणे-शिर्डी संस्थानने भाविकांच्या पोषाखाबाबत जो काही निर्णय घेतला आहे, त्याला ब्राह्मण महासंघाने पाठिंबा दर्शविला आहे. पुण्यात ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीने पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. तसेच तृप्ती देसाई यांनी शिर्डीतील तो फलक हटविण्याचा प्रयत्न केल्यास ब्राह्मण महासंघ त्याला तोडीस तोड उत्तर देईल, असा इशाराही ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला.
पुणे- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी  पुणे शहरात शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी बांधवाचा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियम पाळून हा मोर्चा आयोजित केला जाईल, असे आश्वासन आंदोलकांनी देऊनही शेवटच्या क्षणापर्यंत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने शनिवारवाडा येथे काही काळ संघर्षाचे वातावरण निर्माण झाले. अखरे...
पुणे --पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी प्रक्रियेला पुण्यातल्या बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरुवात झाली आहे. या दोन्ही मतदारसंघात निकाल पहिल्या पसंतीच्या मतामध्येच  लागणार की पुढील फेऱ्यांची मतमोजणी करावी लागणार याबाबतचे चित्र पदवीधरसाठी रात्री नऊ वाजताच्या सुमारास तर शिक्षक साठीचे चित्र साधारण सायंकाळी 7 वाजेपर्यत स्पष्ट होऊ शकते अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव...
मुंबईः उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी उभारणार असल्याचे वक्तव्य केल्यापासून या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले आहे. दरम्यान, योगी दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आल्यानंतर तर, या चर्चेला आणखीनच उधाण आले होते. महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपच्या नेत्यांमध्ये यावरून शाब्दिक द्वंद्व सुरु होते. काही झाले तरी बॉलीवूड मुंबईच्या बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा महाविकास...
पुणे : पुणे पदवीधर मतदार संघाच्या एका जागेसाठी मंगळवारी मतदान झाले. यावेळी झालेल्या विक्रमी मतदानामुळे आता सर्वांचे लक्ष्य या वाढलेल्या मतदानाचा फायदा नक्की कोणाला होणार आणि कोण बाजी मारणार याकडे लागले आहे. उद्या (गुरुवार)डी. ३ डिसेंबर रोजी पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मतमोजणी होणार आहे.पुणे पदवीधरच्या जागेसाठी यावेळी तब्बल...
पुणे— महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन, पदवीधर  दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 69.08 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. दरम्यान, पुणे पदवीधर मतदार संघात अंदाजे 50.30 टक्के तर पुणे विभागीय शिक्षक मतदार संघात 70.44 टक्के मतदान झाले. या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढल्याने...