gtag('js', new Date());
पुणे- विधानपरिषदेच्या विधान परिषदेच्या लक्षवेधी ठरलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे अरुण लाड यांनी भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा धोबीपछाड करत सुमारे 48 हजार 824 मतांनी दणदणीत पराभव केला, सुरुवातीला एकतर्फी चुरशीची वाटलेली हे निवडणूक एकतर्फी झाली.  लाड यांनी पहिल्या पसंतीच्या क्रमांकावरच विजय संपादित केल्याने दुसऱ्या क्रमांकाची मतांची मतमोजणी करण्याची वेळ आली...
पुणे- पुणे पदवीधर मतदार संघ आणि शिक्षण मतदार संघाच्या मत पत्रिकांच्या छाननीला गुरुवारी दुपारी सुरुवात झाली असून रात्री उशिरा सुमारे एक लाख मतपत्रिकांची छाननी पूर्ण झाली आहे. उर्वरित मतपत्रिकांची छाननी पूर्ण झाल्यानंतर विजयासाठी आवश्यक असलेला कोटा निश्चित करून निवडणूक आयोगाकडून मतमोजणीला सुरुवात होईल. शिक्षक मतदार संघातील पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मतपत्रिका वैध,...
पुणे -पुणे शहराचे पाेलीस अधिकारी व कर्मचारी अवैध धद्यांवर कारवाई करत असताना युनिट चारचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांना बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पाेलीसांनी गुटख्यातील हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तीन काेटी 47 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नऊ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पाेलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेली आहे. 
पुणे-शिर्डी संस्थानने भाविकांच्या पोषाखाबाबत जो काही निर्णय घेतला आहे, त्याला ब्राह्मण महासंघाने पाठिंबा दर्शविला आहे. पुण्यात ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीने पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. तसेच तृप्ती देसाई यांनी शिर्डीतील तो फलक हटविण्याचा प्रयत्न केल्यास ब्राह्मण महासंघ त्याला तोडीस तोड उत्तर देईल, असा इशाराही ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला.
पुणे- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी  पुणे शहरात शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी बांधवाचा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियम पाळून हा मोर्चा आयोजित केला जाईल, असे आश्वासन आंदोलकांनी देऊनही शेवटच्या क्षणापर्यंत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने शनिवारवाडा येथे काही काळ संघर्षाचे वातावरण निर्माण झाले. अखरे...
पुणे --पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी प्रक्रियेला पुण्यातल्या बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरुवात झाली आहे. या दोन्ही मतदारसंघात निकाल पहिल्या पसंतीच्या मतामध्येच  लागणार की पुढील फेऱ्यांची मतमोजणी करावी लागणार याबाबतचे चित्र पदवीधरसाठी रात्री नऊ वाजताच्या सुमारास तर शिक्षक साठीचे चित्र साधारण सायंकाळी 7 वाजेपर्यत स्पष्ट होऊ शकते अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव...