पुणे-एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना लिमलेटची गोळी मिळती की कॅडबरी हे पहावं लागेल असं वक्तव्य केले होते. त्यानंतर पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला होता. खडसे यांनी चंद्रकांत पाटील कुल्फी आणि चॉकलेटसाठी भाजपमध्ये आले अशी खोचक टीका केली होती. त्यावरून आता दोघांमध्ये कलगीतुरा रंगणार असं वाटलं होतं परंतु,चंद्रकांत पाटील यांनी आता एकनाथ खडसे हा विषय भाजपाकडून संपल्याचे संकेत दिले आहेत. ‘रात गयी, बात गयी’ असं वक्तव्य करत चंद्रकांत पाटील यांनी हा विषय संपल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुण्यात पीएमपीएमएलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खास योजनेच शुभारंभ आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील,पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ,याच्या हस्ते झाला यामध्ये ५ रुपयांत ५ किलोमीटर अशी ही योजना आहे.महत्वाचं म्हणजे दर ५ मिनिटाला ही बस उपलब्ध होणार आहे.या योजनेला अटल म्हणजेच अलाइनिंग ट्रान्झिट ऑन ऑल लेन्स असं नाव देण्यात आलंय. मध्यवर्ती पुणे तसेच उपनगरांतील एकूण ४६ मार्गांवर अशा सुमारे ३५० मिडी बसेस धावणार आहेत.