gtag('js', new Date());
पुणे- एल्गार ही बेकायदेशीर नाही, संविधानविरोधी काम करणारी नाही, दंगली भडकावण्याचं काम आम्ही करत नाही, इतरांसारखे आम्ही एकमेकांना आपापसात लढायला लावत नाही. भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी अटकेत असलेल्यांची मी चांगली सहकारी आहे,  त्यांनी कोणती चूक केली आहे असे मला वाटत नाही,  त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही तरी हजारो पानांचे चार्जशीट दाखल केलं गेलं ,कायद्यावर आधारीत न्यायव्यवस्था आणणं...
राळेगण सिद्धी- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपोषण करण्याचा इशारा केंद्र सरकारला दिला असतानाच एक दिवस अगोदर त्यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर शिवसेनेने त्यांना टोकले आहे. ‘दैनिक सामनाच्या’ आजच्या अग्रलेखात अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे म्हटले आहे. त्यावर अण्णा हजारे संतापले आहेत.आमच्या समोर भाजप, शिवसेना किंवा काँग्रेस असे कोणीही...
अहमदनगर- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. अजित पवार यांनी आपल्या खास शैलीतून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून भाजपशी घरोबा केलेल्या पिचड पिता- पुत्रांचा समाचार घेतला तर आपल्या विनोदी शैलीत प्राजक्त तणपुरे यांना विकास...
कदाचित माझी अशी पोस्ट बघून अनेकांना आश्चर्य वाटेल....मी अण्णांचा पक्का समर्थक आहे, चाहता आहे परंतु अंधभक्त नाही त्यामुळे आंधळेपणाने त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे समर्थन नक्कीच करणार नाही पण त्याच वेळी ते चुकले म्हणून त्यांच्यावर वाईट भाषेत टीका करून माझी पातळीही दाखवणार नाही.भक्त आणि नवभक्त केंद्र किंवा राज्य सरकार कितीही चुकले  तरी कोणत्याही...
पुणे -श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने पुणे महानगरात १५ जानेवारी पासून निधीसंकलन अभियान सुरु आहे. त्यात एकूण ६ लाखापेक्षा अधिक परिवारापर्यंत स्वयंसेवक पोहोचले असून निधीसंकलनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आबालवृद्धांसह, भाजीवाले, पेपर टाकणारे, दुधवाले, कामगार वर्ग आणि तृतीय पंथीयांनीसुद्धा अभियानात सहभाग नोंदवत निधी दिला आहे. अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर निर्माण निधी संकलन अभियानाचे ...
पुणे-'अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य कोणी कोणाला उचलून देण्याची गोष्ट नाही. लेखकांवर-कलाकारांवर अघोषित बंदी आली आहे. समाजाला लेखन स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती निरर्थक वाटू लागली आहे. विरोधी विचारांना देशद्रोहाचे रूप दिले जात आहे. (Opposition views are being branded as treason) राजधर्माच्या नावाखाली धार्मिक हिंस्रपणा वाढत आहे,' अशा शब्दांत कवयित्री अनुराधा पाटील यांनी सामाजिक परिस्थितीवर बोट ठेवले.