आपल्यावर राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला आहे – हर्षवर्धन जाधव: १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

क्राईम
Spread the love

पुणे–ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्या प्रकरणी कन्नडचे माजी आमदार व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव (वय-43) यांना18 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायाधिश एम.पी. परदेशी यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला. दरम्यान, आपल्यावर राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला असून बावधन येथे दुकानात गेलो असता माझे आणि सहकारी महिलेचे अपहरण करुन मला मारहाण करण्यात आली असे हर्षवर्धन जाधव यांनी न्यायालयासमोर सांगितले.

14 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता औंध येथील एका बँकेसमोर घडली. फिर्यादी यांचे आई-वडील सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून औंध वरुन जात होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या जाधव यांच्या मोटारीचा दरवाजा अचानक उघडला आणि चड्डा दांपत्य दरवाज्याच्या धक्क्याने खाली पडले. त्यानंतर झालेल्या वादानंतर जाधव यांनी दाम्पत्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केला. जाधव यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. जखमी दाम्पत्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

हा गुन्हा अजामीनपात्र आहे, या प्रकरणात इषा बालाकांत झा यांच्यावरही गुन्हा दाखल असून त्यांना अटक करणे बाकी आहे. तसेच हल्ला करण्याचे इतर काही कारण आहे आदी तपास करायचा असल्याने सरकारी वकील व्ही. सी. मुरळीकर यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

हर्षवर्धन जाधव यांनी आपल्यावर राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन येथे दुकानात गेलो असता माझे आणि सहकारी महिलेचे अपहरण करुन मारहाण करण्यात आली. त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार द्यायला गेलो असता पोलिसांकडून माझी तक्रार घेण्यात आली नाही असे नायालायासमोर सांगितले.

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांचे वकील जहिर पठाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले, हर्षवर्धन जावध सहकारी महिलेसह औंध येथून मोटारीने जात असतांना दुचाकी आडवी आणण्यात आली. अमन चड्डा, करण चड्डा, काँग्रेसचे नगरसेवक मनिष आनंद यांनी जाधव आणि त्यांची सहकारी महिलेला दुसर्‍या गाडीत बसविले. या

मोटारीत सहकारी महिलेचा विनयभंग केला. तसेच जाधव यांना मारहाण केली. यानंतर जाधव हे पोलिस ठाण्यात गेले असता त्यांची तक्रार दाखल करुन घेण्यात आली नाही. राजकीय दडपणे आणून जाधव यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांचे सासरे केद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा हात आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *