gtag('js', new Date());
पुणे- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव भाजपमध्ये फक्त बोलण्यासाठी आहे. त्यांचं नाव जरी राणे असलं तरी ते चर्चा फक्त चार आण्याची करतात, अशी खोचक टीका महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.आळे ग्रामपंचायतीचं आणि शिवसेना शाखेचं उद्घाटन अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले,...
पुणे-25 वर्षीय तरूणीवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील जनता वसाहती मध्ये घडली आहे. तरुणीच्या रडण्याचा आवाज लक्षात घेऊन सतर्क नागरिकांमुळे आरोपी गजाआड झाले आहेत.ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. मतीमंद तरुणीच्या असहायतेचा फायदा घेत चार नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचे बोलले जात आहे.या प्रकरणी श्रीकांत सरोदे (36), आदित्य ऊर्फ सन्या पवार...
पुणे(प्रतिनिधि)--ज्या भूमीवर आपण एकत्र आलो आहोत, तिचा इतिहास पाहा. हा खेळच होता ज्याने शिवा नावाच्या एका मुलाला छत्रपती शिवाजी महाराज बनवलं. गुरु समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव आणि जिजाऊ माँसाहेब लहानपणापासूनच त्यांना अशी शिकवण दिली होती, ज्यातून ते एक राष्ट्रनायक बनले. भारतीय सेनाही त्या परंपरेला पुढे घेऊन जात आहे. भारतीय खेळाच्या इतिहासात मेजर ध्यानचंद, कॅप्टन मिल्खा सिंग,...
पुणे-प्रत्येकाने आपापले भान ठेऊन वक्तव्य केले तर ही वेळ आलीच नसती. तुम्ही मागच्या काहींच्या  व्यक्तव्याचे दाखले देता, परंतु त्यांनी शपथ घेतली नव्हती. ज्यावेळी राज्यपालांच्या साक्षीने शपथ घेतली जाते त्यावेळी आपण भान ठेवून जबाबदारीने वक्तव्य केले पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून उद्भवलेल्या वादाबद्दल व्यक्त केले.पुण्यातील कोरोना...
कोरोना काळातील एकत्र आणि विभक्त कुटुंबातील काही निरीक्षणे लक्षात घेता एकत्र  कुटुंबातील महिला बाधित होवूनही विभक्त कुटुंबातील बाधीत महिलांपेक्षा त्यांना ताण कमी आल्याचे स्पष्ट झाले आहे. एकत्र कुटुंबात सर्व जबाबदाऱ्यांचे स्वाभाविक विभाजन होत असल्यामुळे या कुटुंबातील महिलांना तीव्र ताण जाणवला नाही. एकत्र कुटुंब पद्धती आणि भारतीय नागरिकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये असलेली ‘कुटुंबवत्सलता’ कोरोना काळात अधोरेखित झाली आहे....
पुणे – पुण्यात सासरवाडीच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या ओढणीने या तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आपले आयुष्य संपवले. सासुरवाडीच्या जाचाला कंटाळून तसेच कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये तरुणाने केला आहे. यावेळी त्याने पत्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत कडक कारवाईची मागणी केली आहे.