25 वर्षीय तरूणीवर सामुहिक बलात्कार : सतर्क नागरिकांमुळे आरोपी गजाआड

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे-25 वर्षीय तरूणीवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील जनता वसाहती मध्ये घडली आहे. तरुणीच्या रडण्याचा आवाज लक्षात घेऊन सतर्क नागरिकांमुळे आरोपी गजाआड झाले आहेत.ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. मतीमंद तरुणीच्या असहायतेचा फायदा घेत चार नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचे बोलले जात आहे.

या प्रकरणी श्रीकांत सरोदे (36), आदित्य ऊर्फ सन्या पवार (19), सुर्वेश जाधव (36) आणि आशिष मोहिते (18, सर्व रा. जनता वसाहत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

भारती विद्यापीठ परिसरात राहणारी एक 25 वर्षाची तरुणी स्वारगेटवरुन शुक्रवारी सायंकाळी घरी जात होती. यावेळी आरोपींपैकी एकाने तिला फूस लावून जनता वसाहतीत आणले. त्यानंतर त्याने इतरांना बोलावून घेतले. चौघांनी मिळून तिच्यावर एका मागोमाग एक बलात्कार केला. हा सर्व प्रकार सुरु असताना या तरुणीच्या रडण्याचा आवाज आल्याने गल्लीत राहणार्‍यांना संशय आला. त्यांनी घराला बाहेरुन कडी लावली व पोलिसांना कळविले. दत्तवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले व या तरुणीची सुटका करुन चौघांना अटक केली.

या घटनेमुळं प्रचंड खळबळ उडाली आहे. दत्तवाडी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याविरूध्द सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दत्तवाडी पोलिस करीत आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *