gtag('js', new Date());
पुणे - हिंदू आध्यात्मिक सेवा फाऊंडेशनच्या (एचएसएसएफ) नेतृत्वात पुणे महानगरातील विविध संस्था संघटनांतर्फे रविवारी (२९ ऑगस्ट २०२१) प्रकृती वंदन दिन साजरा करण्यात आला.चराचर सृष्टीतील प्रत्येक घटक हा तितकाच महत्त्वाचा आहे. आणि कोरोनाचा या महामारीत मानवाला ऑक्सिजनचे, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधिक गंभीरतेने  कळाले. असा सूर विविध मान्यवरांनी या कार्यक्रमांदरम्यान व्यक्त केलेल्या...
पुणे-- राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्यापुरतं मर्यादित नसून सामाजिक सक्रियता, विधायक क्षेत्र कार्य, शैक्षणिक, राजकीय आणि अध्यात्म या गोष्टी एकत्रितरित्या करणे म्हणजे राजकारण आहे, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा....
पुणे- : कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा झाली तर महाविद्यालये सुरू करण्यास कोणतीही हरकत नाही. परंतु, करोनाची तिसरी लाट येण्याची चिन्हे असतील तर महाविद्यालये सुरू करणे धाडसाचे होईल. त्यामुळे ‘टास्क फोर्स’कडून देण्यात येणाऱ्या सूचनेनुसार महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.पुण्यातील अफगाणिस्तानच्या...
पुणे-शेतकऱ्यांना गत वर्षीच्या खरीप विम्याची रक्कम तातडीने द्यावी. तसेच पीक विमा योजना कंपन्यांच्या हिताऐवजी शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवावी या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने लाल बावट्यांसह शेकडो शेतकऱ्यांनी मोर्चा काढत पुणे येथील कृषी आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन केले. पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर न मिळाल्यास महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन उभं करू असा इशारा अखिल भारतीय...
पुणे– धार्मिक स्थळे बंद असतील, तर सर्वांनी पूजा-प्रार्थनेसाठी काय मातोश्रीवर जायचे का?, असा सवाल करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष मतांसाठी देव, धर्म मानत नाहीत, त्यांना खूष करण्यासाठी उद्धव ठाकरे मंदिरे खुली करायला तयार नसल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. दरम्यान, लोक फार काळ आपल्या भावना दाबून ठेवू शकणार नाहीत. आणखी काही काळानंतर लोक...
पुणे : -छत्रपती शिवाजी महाराजांना खेळाचे शिक्षण समर्थ रामदास व दादोजी कोंडदेव यांनी दिले असं वक्तव्य देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत आणि त्याचा निषेध करत राजनाथ सिंह यांनी माफी मागावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. तर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही निषेध केला आहे.