भारतीय खेळाच्या इतिहासात नीरज चोप्रानेही आपलं नाव सुवर्ण अक्षरांमध्ये जोडलं – राजनाथ सिंह

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)–ज्या भूमीवर आपण एकत्र आलो आहोत, तिचा इतिहास पाहा. हा खेळच होता ज्याने शिवा नावाच्या एका मुलाला छत्रपती शिवाजी महाराज बनवलं. गुरु समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव आणि जिजाऊ माँसाहेब लहानपणापासूनच त्यांना अशी शिकवण दिली होती, ज्यातून ते एक राष्ट्रनायक बनले. भारतीय सेनाही त्या परंपरेला पुढे घेऊन जात आहे. भारतीय खेळाच्या इतिहासात मेजर ध्यानचंद, कॅप्टन मिल्खा सिंग, कर्नल राजवर्धनसिंह राठोड, कॅप्टन विजयकुमार यांच्या परंपरेत आता सुभेदार नीरज चोप्रानेही आपलं नाव सुवर्ण अक्षरांमध्ये जोडलं आहे, अशा शब्दात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात गोल्ड मेडल विजेता नीरज चोप्राच्या कामगिरीचं कौतुक केलं. दरम्यान, नीरच चोप्राचं नाव आज पुण्यातील आर्मी स्टेडियमला देण्यात आलं.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आर्मीतील ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेच्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी  ते बोलत होते. यावेळी नाईक सुभेदार दीपक पुनिया यांचा विशेष मेडल देऊन सिंह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसंच नाईक अर्जुनलाल जाट, नाईक सुभेदार विष्णू सर्वनंद, महाराष्ट्रातील नाईक सुभेदार अविनाश सावळे यांनाही यावेळी सन्मान केला गेला. त्यावेळी आर्मीतील ऑलिम्पिक खेळाडूंची शॉल देऊन नीरज चोप्राने राजनाथ सिंह यांचं स्वागत केलं.

आर्मीतील 23 खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्या सर्व खेळाडूंचं राजनाथ सिंह यांनी अभिनंदन केलं. आर्मी स्टेडियमनला नीरज चोप्राचं नाव देण्यात आलं, ही छोटी गोष्ट नाही. हा देशवासियांकडून करण्यात आलेला सन्मान आहे, असं सिंह यावेळी म्हणाले.

नायब सुभेदार दीपक पुनिया आपल्या कांस्य पदकापासून काही अंतरावरुन चुकले, मात्र त्यांचं प्रदर्शन प्रशंसनीय होतं. त्यासह सुभेदार ओरोकिया राजीव यांचं 4 बाय 400 मीटर रिलेमध्ये नवं आशियाई रेकॉर्ड बनवण्याचं प्रदर्शन कौतुकास पात्र आहे, असंही राजनाथ सिंह म्हणाले. खेळ माणसाला फक्त शारिरिक नाही तर सामाजिक, व्यावहारिक, भावनात्मक आणि मानसिक रुपानेही सुदृढ बनवतो. यामुळे माझं मत आहे की एका सैनिकात खरा खेळाडू दडलेला असतो. तर सच्च्या खेळाडूमध्ये एक सैनिक कायम असतो, असंही राजनाथ सिंह म्हणाले.

ASI, भारतीय सेना एक अद्वितीय आणि जागरिक स्तरावरील क्रीडा संस्था आहे. मला सांगण्यात आलं की यांनी आतापर्यंत 34 ऑलिम्पिक, 22 कॉमनवेल्थ गेम्सची पदकं जिंकली आहेत. 21 एशियन गेम्स, 6 युथ ऑलिम्पिक, 13 अर्जुन पुरस्कार विजेता दिले आहेत. भारत सरकारकडून गेल्या काही वर्षात क्रीडा स्पर्धांमध्ये क्वालिटी वाढवण्याचे प्रयत्न होत आहेत. ही फक्त सरकारी स्किम नाही, तर एक आंदोलन आहे. ज्याला आपल्याला अजून पुढे घेऊन जायचं आहे. आपल्याला या प्रयत्नातून यश आणि नवे आयाम गाठायचे आहेत, असंही राजनाथ यांनी म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *