gtag('js', new Date());
पुणे- बालकांप्रमाणे सतत काही ना काही शिकण्याची इच्छा आपल्यात पाहिजे. कितीही प्रगती केली तरी शिकण्याची भूक कायम असली पाहिजे कारण शिकणे बंद झाले तर प्रगती देखील संकुचित होऊन बसेल. कोणतेही काम करताना त्यात सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. इतरांपेक्षा वेगळा विचार करून आपण आपली कलाकृती निर्माण करा. आज प्रत्येकजण शिक्षण घेत आहे, परंतु त्यातील एकालाच पदक...
पिंपरी(प्रतिनिधी)--तळेगाव दाभाडे येथील 72 वर्षीय डॉ. लक्ष्मण कार्ले यांच्या वतीने व जिल्हा रुग्णालय पुणे व प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने  नुकतेच नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिरगाव येथील साईबाबा मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबिरामध्ये 221 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये 19 लोकांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी, तर 6 नागरिकांना...
'थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास' एक वचन सर्वश्रुत आहे. या वचनाला अनुसरून अशा आपल्या  संस्कृतीतल्या संतांची, वीरांची, समाज सुधारकांची व विचारवंतांची चरित्रे पाहिली,  अभ्यासली तर समाज प्रबोधनाबरोबरच समाज परिवर्तनाचे, समाज जागृतीचे व लोकशिक्षणाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य डोळ्यांसमोर उभे राहाते. कर्मवीर भाऊराव पाटील हे त्यांपैकीच एक. या आधुनिक भगिरथाने शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या...
पुणे – अलकाताई मला प्रकाश देणाऱ्या नंदादीपाप्रमाणे वाटतात. त्यांच्या पर्यटनावरील लेखांच्या उत्कृष्ट अंतर्बाह्य मांडणी केलेल्या पुस्तकाने मला खिळवून ठेवले. दोन्ही पुस्तकातील ज्ञान, माहिती व विषयातील विविधता लक्षणीय आहे, असे गौरोदगार ज्येष्ठ साहित्यिका सुमती पवार यांनी काढले.सौ.अलका दराडे लिखित जीवनातील साखरपेरणी व पर्यटनाच्या अनोख्या जगात या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका सौ....
दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे (mother's Day)साजरा केला जातो. ही परंपरा सुमारे 111 वर्षांपासून सुरू आहे. या दिवसाची सुरुवात एना जार्विस (anna jarvis) यांनी केली होती. त्यांनी हा दिवस आपल्या आईला समर्पित केला आणि तो दिवस अशाप्रकारे निवडला की तो त्यांच्या आईच्या पुण्यतिथीच्या (9 मे) आसपास असेल.मदर्स डेच्या सगळ्या...
केरळमधील कालडी या गावी शिवगुरु आणि आर्यांबा या सत्वशील, तपस्वी आणि शिवभक्त जोडप्याला बरेच वर्षे अपत्यप्राप्ती झाली नव्हती. शिवाच्या आराधनेने त्यांना खूप वर्षांनंतर पुत्रलाभ झाला, अपत्यसुख मिळाले. तीव्र बुद्धिमत्ता आणि विलक्षण स्मृती असलेल्या या पुत्राची, शंकर याची मुंज शिवगुरुंनी त्याच्या वयाच्या पाचव्या वर्षीच केली. वयाच्या आठव्या वर्षीच चारही वेदांचे अध्ययन शंकरने पूर्ण केले. वयाच्या बाराव्या वर्षांपर्यंत...