डॉ. लक्ष्मण कार्ले यांच्या वतीने आयोजित नेत्रचिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आरोग्य पुणे-मुंबई
Spread the love

पिंपरी(प्रतिनिधी)–तळेगाव दाभाडे येथील 72 वर्षीय डॉ. लक्ष्मण कार्ले यांच्या वतीने व जिल्हा रुग्णालय पुणे व प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने  नुकतेच नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिरगाव येथील साईबाबा मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबिरामध्ये 221 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये 19 लोकांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी, तर 6 नागरिकांना काचबिंदू व डोळ्यावरील मांस वाढल्याचे निदान झाले. या नागरिकांच्या डोळ्यांवर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, असे डॉ. लक्ष्मण कार्ले यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. शेळके, एमक्युअर फार्माचे गणेश कार्ले, डॉ. युवराज मठपती, असिस्टंट सिव्हिल सर्जन डॉ. शिर्सीकर, साईबाबा ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश देवळे, सचिव सपनालाल चंदानी, मुख्याध्यापक लोखंडे, राकेश मुंगले आदी उपस्थित होते.

 डॉ. लक्ष्मण कार्ले हे गेल्या 20 वर्षांपासून या रुग्णसेवा आणि आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून समाजसेवा करीत आले आहेत. त्यांनी आजपर्यंत विविध रक्तदान शिबिराच्या माध्यमातून माध्यमातून वेगवेगळ्या ब्लड बँकांना जवळपास पाच लाख युनिट रक्तपुरवठा केला आहे. 1993 च्या किल्लारी भूकंपानंतर उद्भवलेल्या कठीण परिस्थितीत त्यांनी रुग्णसेवा करून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. याबरोबरच कोरोना काळात सामाजिक, आध्यात्मिक आणि धार्मिक या क्षेत्रांमध्येही त्यांनी विविध प्रकारे मदत करीत उल्लेखनीय काम केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *