मातृदिन: ज्यांनी सुरू केला हा दिवस त्यांनीच तो बंद करण्यासाठी का उघडली होती मोहीम?


दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे (mother’s Day)साजरा केला जातो. ही परंपरा सुमारे 111 वर्षांपासून सुरू आहे. या दिवसाची सुरुवात एना जार्विस (anna jarvis) यांनी केली होती. त्यांनी हा दिवस आपल्या आईला समर्पित केला आणि तो दिवस अशाप्रकारे निवडला की तो त्यांच्या आईच्या पुण्यतिथीच्या (9 मे) आसपास असेल.

मदर्स डेच्या सगळ्या कथा तुम्ही वाचल्या असतीलच. या दिवसाची सुरुवात कशी झाली? हा दिवस मातांना समर्पित कसा केला जातो? त्यांच्या बलिदानासाठी हा दिवस संस्मरणीय कसा बनला? या दिवशी त्यांच्या समर्पणाबद्दल मातांचे कौतुक आणि आभार कसे मानले जातात?  अशा अनेक गोष्टी या डेच्या निमिताने आपण वाचल्या असतील. परंतु, तुम्हाला हे माहीती आहे का की, ज्या महिलेने या दिवसाची सुरुवात केली होती, त्यांनीच  तो दिवस बंद करण्याचा प्रयत्न केला होता. निश्चितच त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही, परंतु त्याचे कुटुंब आणि नातेवाईक हा दिवस साजरा करत नाहीत. काय होते याचे कारण?  ज्यांनी हा दिवस सुरू केला तेच का त्याच्या विरोधात का गेले? याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ या..

अधिक वाचा  शेतकऱ्याच्या खिशात पैसा आला तरच देश सामर्थ्यवान होईल - अनिल घनवट

यामुळे मे निवडण्यात आला महिन्याचा दुसरा रविवार

प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो हे सर्वांनाच माहीत आहे. ही परंपरा सुमारे 111 वर्षांपासून सुरू आहे. या दिवसाची सुरुवात एना जार्विस यांनी केली होती. त्यांनी हा दिवस आपल्या आईला समर्पित केला आणि त्याची तारीख अशाप्रकारे निवडली की ती त्यांच्या आईच्या पुण्यतिथीच्या (9 मे) आसपास येईल. यंदा आज (8 मे) रोजी मदर्स डे आहे.

मदर्स डेची मूळ थीम काय होती?

वास्तविक, मदर्स डेची सुरुवात एना जार्विसची आई एनरीव्स जार्विस यांना करायची होती. जगातील सर्व मातांना त्यांच्या अतुलनीय सेवेसाठी सन्मानित केले जावे यासाठी एक दिवस सुरू करण्याचा त्यांचा हेतू होता. तथापि, 1905 मध्ये एनरीव्स जार्विस यांचे निधन झाले आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांची मुलगी एना जार्विस यांनी घेतली. मात्र, एना यांनी त्या दिवसाची थीम थोडी बदलली. त्यांनी सांगितले, की या दिवशी लोकांनी  आपल्या आईच्या बलिदानाचे स्मरण करून आणि त्यांचे कौतुक करावे. लोकांना तिची कल्पना इतकी आवडली की ती स्वीकारण्यात आली आणि एनरीव्स यांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी 1908 मध्ये पहिल्यांदा मदर्स डे साजरा करण्यात आला.

अधिक वाचा  पूजा वनदुर्गांची : धैर्यशील हमसाय

यामुळे एना यांनी केला मदर्स डेला विरोध

जेव्हा जगात पहिल्यांदा मदर्स डे साजरा करण्यात आला, तेव्हा एना जार्विस ही एक त्याची प्रकारे पोस्टर गर्ल होती. त्यांनी यादिवशी आपल्या आईची आवडती पांढरी कार्नेशन फुले महिलांना वाटली आणि ती एक प्रथाच झाली. परंतु, यामुळे फुलांचे व्यापारीकरण इतके वाढले की काही वर्षांत मातृदिनाच्या दिवशी पांढऱ्या कार्नेशनच्या फुलांचा काळाबाजार होऊ लागला. लोक त्यांना चढ्या भावाने विकत घेण्याचा प्रयत्न करू लागले. हे पाहून एना संतापल्या आणि त्यांनी हा दिवसच बंद करण्याची मोहीम सुरू केली.

कुठपर्यंत पोहचली ही मोहीम?

मदर्स डेच्या दिवशी व्हाईट कार्नेशनच्या फुलांची विक्री झाल्यानंतर टॉफी, चॉकलेट आणि सर्व प्रकारच्या भेटवस्तूंचा ट्रेंडही येऊ लागला. अशा स्थितीत एना यांनी जनतेला खडसावले. त्या म्हणाल्या की, लोकांनी आपल्या लोभापोटी या दिवसाचे मार्केटिंग करून त्याचे महत्त्व कमी केले आहे. 1920 साली त्यांनी लोकांना फुले खरेदी न करण्याचे आवाहनही केले होते. एना यांनी शेवटच्या क्षणापर्यंत हा दिवस संपवण्याची मोहिम सुरू ठेवली.  त्यासाठी त्यांनी स्वाक्षरी मोहीमही चालवली, पण त्यात त्यांना यश आले नाही. १९४८ च्या सुमारास एना यांनी या जगाचा निरोप घेतला.

अधिक वाचा  फडणवीस म्हणाले कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही.. फक्त हा पॅटर्न चालणार...

एना यांचे नातेवाईकही हा दिवस साजरा करत नाहीत

एना यांनी मदर्स डेच्या बाजारीकरणाच्या विरोधात केलेल्या मोहिमेचा संपूर्ण जगावर भलेही परिणाम झाला नसेल, पण त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक हा दिवस साजरा करत नाहीत. खरं तर, काही वर्षांपूर्वी  मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत एना यांच्या एक नातेवाईक एलिझाबेथ बार यांनी सांगितले की, तिच्या काकू आणि वडिलांनी कधीही मदर्स डे साजरा केला नाही, कारण ते एना यांचा खूप आदर करतात. ते एना यांच्या बाजारीकरणाने या खास दिवसाचा अर्थच बदलून टाकला या भावनेबाबत खूप प्रभावित झाले होते.   

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love