gtag('js', new Date());
पुणे— आम्ही एनडीएत आहोत. आम्ही एनडीए सोडलेले नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रीय समाज पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद मिळायला हवे. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना भेटून मंत्रिपदाची मागणी केली आहे. त्यामुळे आम्हाला मंत्रिपद द्यायचं की नाही हा निर्णय त्यांच्या कोर्टात आहे. मित्र पक्षाला सोबत घ्यावं की घेऊ नये हे भाजपने ठरवावं,  अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय...
पुणे-- “ सर्वात प्राचीन भारतीय संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे आज ही येथे ऋषीतुल्य व्यक्तींचा सत्कार होतो. या देशाची खरी संस्कृती ऋषी आणि कृषीची आहे. अशा वेळेस भारतात ऋषीतूल्य व्यक्तींचा सत्कार होणे हे भारतीय संस्कृतीचे द्योतक आहे. असे विचार जगविख्यात संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी मांडले.”शारदा ज्ञान पीठम...
पुणे : पं. अरविंदकुमार आझाद यांच्या तालायन म्युझिक सर्कलतर्फे ज्येष्ठ तबलावादक पद्मविभूषण पं. किशन महाराज यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  यामध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असून  प्रसिद्ध तबलावादक पं. कुमार बोस, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया, जगविख्यात गायिका आश्विनी भिडे-देशपांडे, कौशिकी चक्रवर्ती, ख्यातनाम तबलावादक सुखविंदर सिंह नामधारी, पं. स्वपन...
पुणे-पुण्यातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो . या उत्सवाचा पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून यंदा पुणे शहरात तीन हजार ५६६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि चार लाख ५४ हजार ६८६ घरगुती गणपतीची संख्या असणार आहे. गणेशोत्सव सुरळीत पार पडावा याकरिता साडेसात हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी...
पुणे बाजार समितीच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करा
पुणे— रोहित पवार यांची कोणतीही चौकशी सुरू झालेली नाही. अशा बातम्या केवळ माध्यमांमध्ये सुरू आहेत. याबाबाद माझे रोहित बरोबर बोलणे झालं आहे. त्याला काही नोटीस आलेली नाही.आमच्या कुटुंबातील कोणालाही नोटीस आली तर आमची सहकार्याची भूमिका राहिली आहे. माझा न्यायव्यवस्थेवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला काही लपवयाची गरज नाही. आम्हा कोणालाही नोटीस आलीच तर आम्ही त्याला नक्कीच...
पुणे--भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथील जागतिक परिषदेत शांतता व मानवतेचा संदेश दिला. स्वामी विवेकानंदांना अभिवादन व विश्वशांतीचा प्रसार आणि दहशतवाद मुक्तीसाठी ११ सप्टेंबर २०२२ रोजी एक लाख शिवभक्तांकडून महारुद्राभिषेक करण्यात येणार आहे. पुण्यातील रुद्राभिषेक ओंकारेश्वर मंदिरात होणार आहे, अशी माहिती संयोजक व वयम संस्थेचे संस्थापक गौरव त्रिपाठी यांनी पत्रकार...