पंकजा मुंडे कोणत्याही पक्षात जाणार नाहीत- महादेव जानकर


पुणे— आम्ही एनडीएत आहोत. आम्ही एनडीए सोडलेले नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रीय समाज पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद मिळायला हवे. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना भेटून मंत्रिपदाची मागणी केली आहे. त्यामुळे आम्हाला मंत्रिपद द्यायचं की नाही हा निर्णय त्यांच्या कोर्टात आहे. मित्र पक्षाला सोबत घ्यावं की घेऊ नये हे भाजपने ठरवावं,  अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी व्यक्त केली.  दरम्यान,ऊन पाऊस सर्वच पक्षात सुरू असतो त्यामुळे पंकजा मुंडे कोणत्याही पक्षात जाणार नाहीत, असेही ते म्हणाले.

महादेव जानकर यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी  संवाद साधला. शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यामध्ये भाजपच्या काही मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. मात्र, या मंत्रिमंडळात मित्रपक्षांना आणि महिलांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे मित्रपक्ष तसेच पंकजा मुंडेही नाराज असल्याचे बोलले जात आहे. याबाबत विचारले असता त्यांनी  राष्ट्रीय समाज पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद मिळायला हवे, अशी पुन्हा मागणी केली आहे. तसेच पंकजा मुंडे या भाजपमध्येच राहणार आहेत.  त्यांच्या वडिलांचं आयुष्य भाजपमध्ये गेलं. त्यांचंही गेलं आहे. त्या कुठे जाणार नाहीत. भाजप सोडणार नाहीत. ऊन पाऊस सर्वच पक्षात सुरू असतो, असंही ते म्हणाले.

अधिक वाचा  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजलि ..

जानकर यांनी शिंदे सरकारचं कौतुक केलं. शिंदे फडणवीस सरकार विकासाच्या राज्यात चांगली कामं होत आहेत दृष्टिकोनातून पुढे जात आहे. अशा शब्दात त्यांनी सरकारच्या कामाचं कौतुक केलं.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love