पुण्यात गणेश मिरवणुकीतील ढोल ताशा पथक मर्यादेवर यंदा निर्बंध नाही

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे-पुण्यातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो . या उत्सवाचा पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून यंदा पुणे शहरात तीन हजार ५६६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि चार लाख ५४ हजार ६८६ घरगुती गणपतीची संख्या असणार आहे. गणेशोत्सव सुरळीत पार पडावा याकरिता साडेसात हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी यंदा गणेश मंडळांनी किती ढोल ताशा पथके मिरवणुकीत ठेवावीत यावर निर्बंध असणार नाही अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली आहे .

यावेळी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, राहुल श्रीरामे, ए.राजा उपस्थित होते.

पुण्यात बंदोबस्त करिता बीडीडीडी पथके, क्यू आर टी चे अधिकारी ,अंमलदार तैनात करण्यात येणार असून वाहतूक नियंत्रणा करीता वाहतूक शाखेकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. पुणे शहरात गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरीता एकूण 1709 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

मेट्रोच्या कामामुळे मिरवणुकीस प्रश्न निर्माण

पुण्यात विविध मार्गांवर सध्या पुणे मेट्रोचे कामकाज सुरू आहे, त्यामुळे गणेश मिरवणुकींना मिरवणूक काढताना काही निर्बंध येणार आहे.डेक्कन पो.स्टे. अंतर्गत छत्रपती संभाजी पूल, लकड़ी पल मेट्रो ओव्हर ब्रिज उंची २१ फूट, गरवारे मेट्रो स्टेशन १८

फूट, कर्वे रोडवरील ओव्हर ब्रिजच्या दोन्ही बाजुस सव्र्हस रोडची रुंदी १५ फूट व पुणे मनपा मेट्रो पूल २१ फूट असल्यामुळे विसर्जन मिरवणुकीस अडथळा होवू शकतो. वनाज मेट्रो स्टेशन कॉन्क्चर पिलर २० फूट, आनंदनगर मेट्रो स्टेशन कॉन्क्चर पिलर १६५ फूट पडल स्टेशन कॉन्क्चर पिलर १७ फूट, नळस्टॉप मेट्रो स्टेशन कर्वे रोड, पुणे १४ फूट नळस्टॉप करोड १४ फूट उंच असल्याने विसर्जन मिरवणुकीस अडथळा होवू शकतो. गणेशोत्सव काळात पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी, गणेशोत्सव शांततेत पार पडावा याकरीता गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शांतता समिती, पोलीस मित्र समिती यांना आयुक्त, परिमंडळीय पोलीस उप-आयुक्त, पोलीस स्टेशन स्तरावर एकूण ६९ बैठका घेण्यात आल्या असून गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना गणेशोत्सव साजरा करणेबाबत मार्गदर्शनपर सुचना दिल्या.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *