gtag('js', new Date());
पुणे - जागतिक औषध कंपनी ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्स लि.ने  (ग्लेनमार्क) हृदयविकारावरील सॅक्युबिट्रिल + वॅल्सार्टान गोळ्या भारतात सादर केल्या आहेत. सॅक्यू व्ही या ब्रँड नेमसह सादर केलेल्या या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्किप्शननुसार दिवसातून दोनदा घेणे आवश्यक आहे. त्याचे मान्यताप्राप्त इंडिकेशन हे कमी इंजेक्शन फ्रॅक्शनसह क्रॉनिक हार्ट फेल्यर हृदयविकाराशी संबंधित मृत्यू आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याचा धोका कमी करते असा दावा कंपनीतर्फे...
पुणे(प्रतिनिधि)-मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये नांदेडच्या शिवराज राक्षे याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला आसमान दाखवत मानाच्या चांदीच्या गदेवर आपले नाव कोरले. अत्यंत उत्कंठा निर्माण करणाऱ्या लढतीत शिवराज राक्षे 'महाराष्ट्र केसरी' किताबाचा मानकरी ठरला. रणहलगी आणि तुतारीचा निनाद, प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या प्रतिसादात झालेल्या लढतीत नांदेडकडून खेळणाऱ्या राक्षेने सोलापुरच्या महेंद्र गायकवाडला चितपट केले आणि मैदानावर एकच जल्लोष झाला.
पुणे-महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये माती विभागातून महेंद्र गायकवाड व सिकंदर शेख तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर व शिवराज राक्षे यांनी दमदार कामगिरी करताना अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत दोन्ही गटातील मल्ल एकमेकांशी लढून ६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठी दावेदारी दाखल करणार आहेत. माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर हा ‘डबल महाराष्ट्र केसरी’चा दावेदार असून त्यामध्ये त...
पुणे : चंगळवाद आणि अति हव्यासाच्या पोटी आपण हरितक्रांतीचे मूळ बिघडवून टाकले आहे. यामुळे आपण देशातील माती आणि पाणी नष्ट करत चाललो आहोत. हीच परिस्थिती राहिली तर देशातील ग्राम संस्कृती नष्ट होईल आणि देश मोठ्या संकटात सापडेल, अशी भीती व्यक्त करतानाच देशातील ग्राम संस्कृती, कृषी संस्कृती,  गोवंश वाचवला तरच देश वाचेल, अशी भावना आदर्श गाव समितीचे...
पुणे : पुण्यातील तळजाई टेकडीच्या पठारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भरवलेल्या 'प्रांतिक शिबिरा'ला शनिवारी (१४ जानेवारी) चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. तळजाईच्या पठारावर दोनशे एकर जागेवर हे शिबिर उभारण्यात आले होते आणि १४ १५ १६ जानेवारी १९८३ असे तीन दिवस चाललेल्या या शिबिरात तब्बल पस्तीस हजार संघस्वयंसेवकांची उपस्थिती होती. शिबिराला चाळीस वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने स्वयंसेवकांकडून...
पुणे-नायलॉन मांजाचा वापर करण्यास बंदी असतानाही बाजारात सहज उपलब्ध होत असलेल्या नायलॉन मांजामुळे शाळकरी मुले, दुचाकीस्वार, तसेच पक्षी, जनावरांचा हकनाक बळी जात आहे. त्यामुळे अशा धोकादायक चायनीज मांजा विकणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करून अशा दुकानदारांना तडीपार करावे, अशी मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी केली आहे. रामभाऊ जाधव यांनी...