gtag('js', new Date());
  • Home
  • क्रीडा
  • महेंद्र गायकवाड, सिकंदर शेख माती विभागातून तर हर्षवर्धन सदगीर, शिवराज राक्षे गादी विभागातून अंतिम फेरीत : माजी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखचा धक्कादायक पराभव
Image

महेंद्र गायकवाड, सिकंदर शेख माती विभागातून तर हर्षवर्धन सदगीर, शिवराज राक्षे गादी विभागातून अंतिम फेरीत : माजी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखचा धक्कादायक पराभव

Spread the love

पुणे-महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये माती विभागातून महेंद्र गायकवाड व सिकंदर शेख तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर व शिवराज राक्षे यांनी दमदार कामगिरी करताना अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत दोन्ही गटातील मल्ल एकमेकांशी लढून ६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठी दावेदारी दाखल करणार आहेत. माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर हा ‘डबल महाराष्ट्र केसरी’चा दावेदार असून त्यामध्ये त यशस्वी होतो का हे पाहणे औत्स्यूक्याचे ठरणार आहे. दरम्यान,अत्यंत अतीतटीच्या झालेल्या लढाईत माजी महाराष्ट्र केसरी बाळा रफिक शेखचा सिकंदर शेखने चितपट करत धक्कादायक पराभव केला. त्यामुळे बाळा रफिक शेखचे  आव्हान संपुष्टात आले.

माती विभागातून झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने कोल्हापूरच्या शुभम शिदनाळेला पराभूत करताना स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. मैदानात उतरल्यानंतर दोन्ही मल्लांनी एकमेकांना केवळ दहा सेकंदच आजमावले. त्यानंतर महेंद्र गायकवाडने थेट एक टांग डाव टाकला अन शुभमचा तोल गेला, आणि मिळालेल्या संधीचा फायदा करून घेताना महेंद्र गायकवाडने शुभमला थेट चीतपट करताना अंतिम फेरीत प्रवेश केला.

अधिक वाचा  जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन
सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने कोल्हापूरच्या शुभम शिदनाळेला पराभूत केले

दुसर्‍या उपांत्य फेरीत वाशीमच्या सिकंदर शेखने बुलढाण्याच्या बाला रफिक शेखला केवळ  ३० सेकंदात चीतपट करताना माती विभागातून महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत प्रवेश केला. सिकंदर शेखने बाला रफिक शेखवर पहिल्या १५ सेकंदात ताबा मिळविताना २  गुणांची कमाई केली. त्यानंतर आपले आक्रमण अधिक धारधार करताना सिकंदर शेखने बाला रफिकवर भारंदाज डाव टाकताना कुस्ती धोकादायक स्थितीमध्ये नेवून बलाराफिकला दाबत चीतपट करताना मैदान मारले.

वाशीमच्या सिकंदर शेखने बुलढाण्याच्या बाला रफिक शेखला केवळ  ३० सेकंदात चीतपट केले

गादी विभागातून नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने पुणे जिल्ह्याच्या तुषार डुबेला ५-० असे पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. तुषारने निष्क्रिय कुस्ती केल्याने एक गुण हर्षवर्धनला देण्यात आला. त्यानंतर कटऑफमुळे हर्षवर्धनला पुन्हा एकदा एक गुण मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा तुषारच्या निष्क्रिय खेळामुळे हर्षवर्धन सदगीरला एक गुण मिळाला. पहिल्या फेरीत हर्षवर्धनने ३-०  अशी आघाडी घेतली. दुसर्‍या फेरीत हर्षवर्धनने तुषारवर ताबा मिळविताना अजून दोन गुण वसूल केले व गादी विभागाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

अधिक वाचा  आयसीएआय पुणे शाखेचा हीरक महोत्सव व ७४ वा सीए दिन विविध उपक्रमांनी साजरा
नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने पुणे जिल्ह्याच्या तुषार डुबेला पराभूत केले

दुसर्‍या लढतीत नांदेडच्या शिवराज राक्षेने हिंगोलीच्या गणेश जगतापला ११-१  असे पराभूत करताना गादी विभागातून अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्या फेरीत शिवराजने तीन वेळा गणेशला मैदानाबाहेर ढकलताना ३ गुणांची कमाई केली. त्यावेळी गणेशने एकदा शिवराजला मैदानाबाहेर ढकलत एक गुण वसूल केला. त्यानंतर शिवराजने दुहेरी पट काढताना २ गुण मिळविताना ५-१  अशी आघाडी घेतली. दुसर्‍या फेरीत मात्र शिवराजने अजून आक्रामक खेळ करताना गणेशवर ताबा मिळवत २, झोळी डावावर २ आणि कुस्ती धोकादायक स्थितीत नेऊन २ असे तब्बल ६ गुण वसूल करताना गादी विभागाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

नांदेडच्या शिवराज राक्षेने हिंगोलीच्या गणेश जगतापला पराभूत केले

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Related Posts

झायडस पिंकॅथॉन पुणे २०२६: ४५०० महिलांच्या सहभागाने गाजले एएफएमसी मैदान

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)– पुणे शहराची क्रीडा संस्कृती आणि महिलांचा अदम्य उत्साह यांचे दर्शन घडवत, सात वर्षांच्या प्रदीर्घ…


Spread the love
ByByNews24Pune Apr 5, 2026

स्त्रीशक्तीचा अविष्कार! १६० किमी धावत कॅप्टन पूजा मेहरा आणि पूनम करंजकर यांनी गाठले पुणे; ‘पिंकॅथॉन’चा प्रेरणादायी प्रवास संपन्न

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)–चिकाटी, कणखरपणा आणि महिला सक्षमीकरणाचा उत्साह पुन्हा एकदा सजीव झाला आहे; ‘स्पिरिट ऑफ पिंकॅथॉन’च्या (Spirit…


Spread the love
ByByNews24Pune Apr 5, 2026

‘क्रायसॅलिस’चा बॉक्स क्रिकेटमध्ये ऐतिहासिक जागतिक विक्रम; ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद

Spread the love

Spread the love पुणे (प्रतिनिधी): ‘क्रायसॅलिस एंटरप्रेन्योर फोरम’ने (CEF) बॉक्स क्रिकेटच्या मैदानात ऐतिहासिक कामगिरी करत ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये…


Spread the love
ByByNews24Pune Feb 16, 2026

Shivneri Marathon :शिवनेरी मॅरेथॉनमध्ये धावणार देश- विदेशातील धावपटू : १५ फेब्रुवारीला शिवनेरी पायथ्यास महोत्सव

Spread the love

Spread the love Shivneri Marathon : शिवजयंती महोत्सवानिमित्त शिवनेरी ट्रेकर्स असोसिएशन, मोरडे फूड्स व पोल्ट्री  ब्रिडर्स कोआॅर्डिनेशन असोसिएशन यांच्या…


Spread the love
ByByNews24Pune Feb 12, 2026

महेंद्र गायकवाड, सिकंदर शेख माती विभागातून तर हर्षवर्धन सदगीर, शिवराज राक्षे गादी विभागातून अंतिम फेरीत : माजी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखचा धक्कादायक पराभव

by News24Pune time to read: <1 min
0