क्राईम
केतन अग्रवाल हत्या प्रकरण : सिया आणि प्रियकर चेतनचा ४ महिन्यांपूर्वीच झाला होता गुपचूप विवाह?
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधी)-पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित उद्योजक केतन अग्रवाल यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात आता एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप विवाह केला असल्याचा खळबळजनक दावा पोलिसांनी केला असून, त्यांच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅट, कॉल रेकॉर्ड आणि लोकेशनच्या सखोल तपासातून हे धक्कादायक धागेदोरे हाती लागले आहेत. विशेष म्हणजे,...
पुणे-मुंबई
‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात आणि वरुणराजाच्या साक्षीने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारी पालखीचे पंढरीकडे प्रस्थान!
News24Pune -
पुणे (प्रतिनिधी)-"ज्ञानोबा माउली तुकाराम", "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल" अशा गगनभेदी जयघोषात, टाळ-मृदंगाच्या मंगलमय तालावर आणि डोळ्यांत सावळ्या विठुरायाच्या भेटीची आर्त ओढ घेऊन, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याचे आज अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले.यंदा इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेतली होती. पूर परिस्थितीच्या...
पुणे-मुंबई
पुण्यात मुसळधार पावसाचा हाहाकार: १०४० नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर, खडकवासला परिसरात ११५ मि.मी. पावसाची नोंद
News24Pune -
पुणे: पुणे शहरात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, विविध सखल भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने पावले उचलत शहरातील बाधित क्षेत्रातील २६० कुटुंबांमधील एकूण १०४० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. पुणे महानगरपालिकेच्या 'आयसीसीसी' (ICCC) प्रकल्पांतर्गत बसवण्यात आलेल्या वेदर स्टेशन्सच्या आकडेवारीनुसार, शहरात सरासरी ५३ मि.मी. ते...
क्राईम
पुण्यात रक्षकच बनले भक्षक: सहा पोलिसांविरुद्ध अपहरण आणि ५ लाखांच्या खंडणीचा गुन्हा दाखल; ‘स्मार्ट वॉच’मुळे फुटले पोलिसांचे बिंग
News24Pune -
पुणे: पुणे-लोणावळा प्रवासादरम्यान पर्यटकांना अडवून, त्यांना अमली पदार्थांच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत ५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील सहा अज्ञात पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणवेशातील या गुन्हेगारांनी चार पर्यटकांचे अपहरण करून त्यांना तब्बल सात तास बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले होते, मात्र एका तरुणाने आपल्या 'स्मार्ट वॉच'चा कौशल्याने वापर करून मदतीचा...
देश-विदेश
राम मंदिर ट्रस्टचा कायापालट: चंपत राय यांची गच्छंती आणि कृष्ण मोहन यांच्याकडे सूत्रे : कोण आहेत कृष्ण मोहन?
News24Pune -
अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रशासकीय भूकंप झाला असून, गेल्या अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सरचिटणीस चंपत राय आणि ट्रस्टी अनिल मिश्रा यांची सत्ता संपुष्टात आली आहे. ट्रस्टने या दोन्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा स्वीकारला असून, त्यांच्या जागी आता भारतीय वन सेवेतील (IFS) निवृत्त अधिकारी कृष्ण मोहन यांची 'कार्यवाहक सरचिटणीस' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....
पुणे-मुंबई
पुणे मावळ: पाटण गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना; तिकोणे कुटुंबातील तिघांचा मृत्यू
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-पुणे जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील पाटण गावावर सोमवारी पाहते निसर्गाचा भीषण प्रकोप झाला. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी दरड कोसळल्याने एकाच कुटुंबातील तिघांना आपला जीव गमवावा लागला. सोमवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या भीषण दुर्घटनेत नंदू तिकोणे यांचे घर डोंगरावरून आलेल्या माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली पूर्णपणे गाडले गेले.या भीषण दुर्घटनेत तिकोणे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये नंदू तिकोणे...














