नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)–माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे रविवारी सकाळी निधन झाले. तो 82 वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते कोमामध्ये होते. दरम्यान, जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाली साडे आठच्या सुमारास ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. जसवंत सिंह यांची राजकारण आणि समाजाबाबतच्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोनासाठी कायम आठवण काढली जाईल असे त्यांनी म्हटले आहे. जसवंतसिंगजी यांनी प्रथम एक सैनिक म्हणून आणि नंतर राजकारणाच्या माध्यमातून दीर्घकाळ पूर्ण निष्ठेने आपल्या देशाची सेवा केली, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. दरम्यान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, माजी मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले. संरक्षण मंत्रालयाच्या प्रभारींसह अनेक क्षमतांनी त्यांनी देशाची सेवा केली.
जसवंत सिंग यांचा जन्म राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील जसूल गावात 3 जानेवारी 1938 रोजी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव ठाकूर सरदार सिंह आणि आईचे नाव कुंवर बाईसा असे होते. माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांनी अजमेरच्या मायो कॉलेजमधून बीए आणि बीएससी पदवी मिळविली होती. सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करावी, अशी त्यांची सुरुवातीपासून इच्छा होती. त्यांनी त्यांचे हे आपले स्वप्नसुद्धा पूर्ण केले. जसवंतसिंग यांनी सैन्य अधिकारी म्हणून देशाची सेवा केली आणि सेवानिवृत्त झाले.
जसवंत सिंह यांचा विवाह 30 जून 1963 रोजी शीतल कुमारी यांच्याशी झाला. त्यांना दोन मुले आहेत. ते जसवंत सिंह भारतीय जनता पक्षाचे संस्थापक सदस्यांपैकी एक होते. भारतातील प्रदीर्घकाळ सेवा देणारे ते खासदार होते. 1980 ते 2014 दरम्यान ते कधी लोकसभेचे तर कधी राजसभेचे सदस्य होते.