भावनिक होऊ नका, पश्चातापाची वेळ येते : अजित पवार यांचा रोख नक्की कशाकडे?

भावनिक होऊ नका, पश्चातापाची वेळ येते
भावनिक होऊ नका, पश्चातापाची वेळ येते

पुणे(प्रतिनिधि)–भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळे भावनिक होऊन कोणता निर्णय घेऊ नका असे उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड येथे काढले. पवार यांच्या या वक्तव्यामुळे त्यांचा रोख नक्की कशाकडे आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.

आळंदीतील विविध विकास कामांचे भूमीपूजन पवार यांच्या हस्ते गुरुवारी (१२ सप्टेंबर) झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार दिलीप मोहिते, तहसीलदार ज्योती देवरे, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे यावेळी उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले इतके दिवस अनेक जणांना प्रेम दिले. आधार दिला. आता आम्हाला आधार द्यावा. चुकलो तर आमचे कान पकडून जाब विचारा. तुमचा तो अधिकार आहे, असेही ते म्हणाले. खेडमध्ये झालेल्या कार्यक्रमापूर्वीपूर्वी त्यांनी आळंदी येथे खाजगी कार्यक्रमांना देखील भेटी दिल्या यावेळी त्यांनी आळंदी मध्ये सुरू असलेल्या गैरप्रकाराबाबत पोलिसांचा चांगलाच समाचार घेतला. आळंदीत चुकीचे धंदे चालत आहेत. वेडे-वाकडे प्रकार होत आहेत. आळंदीत घडणारे प्रकार चिंताजनक आहेत. पोलिसांना हवे ते दिले जाते. मग, दोन नंबरचे धंदे बंद करण्याची जबाबदारी कोणाची आहे? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांना केला. दोन नंबरचे धंदे बंद झाले नाही. तर, पोलिसांवर कारवाई केली जाईल. आता सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.  दरम्यान, मंदिर परिसरात दारुचे धंदे, आळंदीत वेश्या व्यवसाय सुरु असल्याची तक्रार काँग्रेस कार्यकर्त्यांनी पवार यांच्याकडे केली होती.

अधिक वाचा  ही तर लोकशाही मूल्यांची दिवसाढवळ्या हत्या -डॉ. विश्वजीत कदम

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांसमोर नतमस्तक झाल्याशिवाय आपण पुढे जात नाही. पण, माऊलींच्या आळंदीत घडणारे प्रकार चिंताजनक आहेत. पोलिसांना हवे ते दिले जात आहे. पुण्यात सात तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलायासाठी चार पोलीस ठाणे मंजूर केले आहेत, असेही पवार म्हणाले.

लोकसभेला जे झाले ते गंगेला मिळाले’

आरक्षण मला काढायचे आहे, असे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी परदेशात जाऊन बोलले. हे लोकांनी लक्षात घ्यावे. लोकसभेला जे झाले ते गंगेला मिळाले. आता विधानसभेला आम्हाला आशीर्वाद द्या.  महायुतीत मतभेद होऊ देऊ नका, ज्या पक्षाला जागा जाईल. त्या पक्षाचे मनापासून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love