#Attack on Nikhil Wagle: पत्रकार निखिल वागळे यांच्या वाहनावर भाजपा कार्यकर्त्यांचा हल्ला : महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

Journalist Nikhil Wagle's vehicle attacked by BJP workers
Journalist Nikhil Wagle's vehicle attacked by BJP workers

Attack on Nikhil Wagle — राष्ट्रसेवा दलाच्या (Rashtra Seva dal) सभागृहात ‘निर्भय बनो’(Nirbhay Bano) या कार्यक्रमादरम्यान महायुती(Mahayuti) आणि महाविकास आघाडीचे(Mahavikas Aghadi) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला.जेष्ठ पत्रकार निखिल वागळे(Nikhil Wagle) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) माजी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी(LK Advani) यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट केल्याच्या निषेधार्थ आक्रमक झालेल्या भाजपच्या(BJP) कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पुण्यातील राष्ट्रसेवा दलाच्या ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आलेल्या निखिल वागळे यांच्या गाडीवर शाइफेक करीत त्यांच्या गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. यावेळी महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते.(Journalist Nikhil Wagle’s vehicle attacked by BJP workers)

भारतरत्न पुरस्कार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य केल्या प्रकरणी निखिल वागळे यांच्यावर पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात १५३ (अ), ५०० व ५०५ या कलामांतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रसेवा दलाच्या सभागृहात ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. राष्ट्र सेवा दलाच्या साने गुरुजी स्मारकाच्या आवारात आयोजन करण्यात आलेल्या या सभेसाठी निखील वागळे ,असीम सरोदे, विश्वंभर चौधरी हे प्रमुख वक्ते होते. निखिल वागळे यांनी केलेल्या आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्यामुले  हा कार्यक्रम उधळून लाऊ अस पुणे शहर भाजपने जाहीर केलं होतं.

अधिक वाचा  #हीट अँड रन प्रकरण : अल्पवयीन मुलाच्या चौकशीची बाल न्याय मंडळाकडून पोलिसांना परवानगी : अनेक प्रश्र्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता

केंद्रातील मोदी सरकारविरोधात काही पुरोगामी कार्यकर्त्यांनी एकत्र येत राज्यभर ‘निर्भय बनो’ अंतर्गत सभा सुरु केल्या आहेत. यातील एक सभा शुक्रवारी पुण्यात संध्याकाळी ६.३० वाजता राष्ट्र सेवा दलाच्या कार्यालयात ठेवण्यात आली होती. मात्र,  या सभेला भाजपच्या वतीने जोरदार विरोध करण्यात आला. सभा सुरु होण्यापूर्वीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी जमा होण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते बधत नव्हते. वातावरण भडकण्याची शक्यता लक्षात घेऊन ऍड. असीम सरोदे यांच्या घरी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि ॲड. असीम सरोदे यांनी सभेच्या ठिकाणी जाऊ नये, असे पोलिसांनी त्यांना समजावून सांगितले. पण तरीही चार तासानंतर वागळे आणि सरोदे सभेच्या ठिकाणी जाण्यावर ठाम राहिले. त्यांना पोलीस बंदोबस्तात कार्यक्रमस्थळी नेत असताना हा हल्ला झाला.

अधिक वाचा  भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना अटक; जामिनावर सुटका

वागळे आणि सरोदे ज्या रस्त्याने कार्यक्रमस्थळी येणार होते. त्या प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्ते दबा धरुन बसले होते. गाडी येताच तिच्यावर दगडफेक, अंडी फेक आणि शाई फेक करण्यात आली. त्यानंतर गाडीवर खंडोजीबाबा चौकात तसेच दांडेकर पूल परिसरात दगडफेक करण्यात आली. यातील काही दगड लागून नागरिक जखमी झाले. यामुळे वातावरण आणखीनच तंग झाले.

भाजपच्या  या राडेबाजीविरोधात महाविकास आघाडीचे कार्यकर्तेदेखील एकवटले.  दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला.  दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. परिसरात सुमारे दीड दोन तास हा गोंधळ सुरुच होता. वागळे यांची गाडी फोडत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला व याविरोधात आंदोलन करत दांडेकर पूल रस्ता अडवून धरण्यात आला.  यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली.

पोलिसांनी प्रमुख राजकीय कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर वातावरण  शांत झाले.  वागळे, सरोदे आणि विश्‍वंभर चौधरी अखेर पावणे आठच्या सुमारास कार्यक्रमस्थळी पोहोचले. दरम्यान, निखिल वागळेंविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भातही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

अधिक वाचा  #Chandrasekhar Bawankule : उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे हिंदू सनातन धर्म संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत- चंद्रशेखर बावनकुळे

भाजपकडून होत असलेल्या विरोधानंतरही निखिल वागळे कार्यक्रमस्थळी पोहोचले. यावेळी निर्भय बनो कार्यक्रमाासाठी आलेल्या नागरिकांनी वागळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. यामध्ये काही तरुणी सुद्धा जखमी झाल्या आहेत. भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात वागळे यांच्या  अंगावरही शाई पडली. पोलिस बंदोबंदास्त प्रवास होत असतानाही गाडी चारी बाजूने फोडण्यात आली आहे.  भाजपकडून विरोध केल्यानंतर महाविकास आघाडीकडून वागळे यांचा कार्यक्रम होणारच, असा पवित्रा घेतला. वीटा  सुद्धा फेकून मारण्यात आला, असा आरोप महिला कार्यकर्त्यांनी केला. कपडे फाडण्याचा सुद्धा प्रयत्न  करण्यात आल्याचा आरोप काही महिलांनी केला.

‘पोलिसांना कडक कारवाई करायला सांगणार’- अजित पवार

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या घटेनवर प्रतिक्रिया दिली आहे. “आताच हा प्रकार झाल्याचं मला समजलं, मी तिथल्या पोलीस आयुक्तांशी लगेच बोलणार आणि कडक कारवाई करायला सांगणार आहे. जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love