का केलंअजितदादांनी ते ट्वीट डिलीट? राजकीय चर्चांना उधान


पुणे— भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारे ट्वीट उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. पण, काही वेळानंतर अजितदादांनी ते ट्वीट डिलीट केले. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना त्यांनी ज्या व्यक्ती हयात नाहीत, त्यांच्याबद्दल चांगले बोलावे ही आपली संस्कृती आणि परंपरा आहे. समाजकारण, राजकारण करताना काही गोष्टी वरिष्ठांच्या ऐकाव्या लागतात असे त्यांनी स्पष्ट केले. परंतु,  अजित पवार यांच्या मनात नक्की काय आहे? या चर्चेला उधान आले आहे.

भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज (शुक्रवारी) जयंती आहे. त्यानिमित्त भाजपच्या नेत्यांकडून त्यांना अभिवादन केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील उपाध्याय यांना ट्वीटरद्वारे अभिवादन केले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून यापूर्वी अजित पवार यांनी रा.स्व.संघ अथवा भाजपच्या महापुरुषांबद्दल अशी भुमिका घेतलेली नाही. त्यांचे चिरंजीव पार्थ यांचेही भाजप प्रेम सर्वश्रुत असल्याने नवीन राजकीय समिकरणाची चर्चा रंगली आहे.

अधिक वाचा  अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर: काय म्हणाले पवार?

  अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथ घेऊन सरकार स्थापन केले होते. तेव्हापासून अजित पवार भाजपशी सलगी राखून असल्याचे बोलले जात होते. त्यातच त्यांचे पुत्र पार्थ यांच्याकडून वेळोवेळी भाजपला अनुकूल अशी घेतली जाणारी भूमिका चर्चेचा विषय होती. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आघाडी सरकराच्या विरोधात जाऊन पार्थ यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती, तसेच राम मंदीराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालनंतर जय श्री राम चे ट्विट केल्याने ते चर्चेत होते. त्यामुळे अजित पवार आणि त्यांच्या चिरंजीवाच्या मनात काय घोळते आहे याबाबत शंका उपस्थित केली जाते आहे.

महाआघाडी सरकार मध्ये स्वतः अजित पवार यांची भूमिका अगदी संदिग्ध असते. कोणत्याही निर्णयात कायम पुढे असणारे अजितदादा मागे असतात. भाजपचे नेते, खासदार-आमदार यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध तसेच भाजपमधून त्यांच्याबाबतची विधाने यामुळे आगामी काळात नवीन राजकीय समिकरणे निर्माण होऊ शकतात, असेही सांगण्यात येते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love