अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये तीन महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या जसवंत सिंह यांना का काढून टाकण्यात आले होते पक्षातून?

राजकारण
Spread the love

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)- माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे आज सकाळी निधन आले. भारतीय लष्करात देशसेवा केल्यानंतर सुरुवातीला जनसंघ आणि नंतर भाजपमध्ये त्यांची राजकीय कारकीर्द ही महत्वपूर्ण ठरली. जसवंतसिंग यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये परराष्ट्र, संरक्षण आणि वित्त असे तीन महत्त्वाची खाती सांभाळली. कधी ते लोकसभेचे तर कधी राज्य सभेचे ते सदस्य होते. असे असताना त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. हा काय वाद होता हे जाणून घेऊ या ….

कशी होती जसवंतसिंग यांची राजकीय कारकीर्द How was Jaswant Singh’s political career?

माजी उपराष्ट्रपती आणि एकेकाळी भाजपाचे कट्टरपंथी भैरोसिंग शेखावत यांनी जनसंघामध्ये जसवंत सिंह यांन सामील करून घेतले. जनसंघाच्या प्रवेशानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. 1980 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आले. तेव्हा आले.  अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील 13 दिवसांच्या सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम पाहिले.

दोन वर्षांनंतर वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर जसवंतसिंग हे 5 डिसेंबर 1998 ते 1 जुलै 2002 पर्यंत भारताचे परराष्ट्रमंत्री होते. या पदावर असताना, जसवंत सिंह यांनी भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीचे निराकरण केले. जुलै २००२ मध्ये जसवंत सिंह पुन्हा अर्थमंत्री झाले. त्यांनी मे 2004 पर्यंत अर्थमंत्री म्हणून काम पाहिले.

विमान अपहरण प्रकरणात तीन खतरनाक दहशतवाद्यांना घेवून गेले होते कंधारला

जसवंतसिंग यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये परराष्ट्र, संरक्षण आणि वित्त असे तीन महत्त्वाची खाती सांभाळली. 24 डिसेंबर 1999 रोजी इंडियन एअरलाइन्सच्या विमान क्रमांक आयसी -814 चे अतिरेक्यांनी अपहरण करून ते अफगाणिस्तानच्या कंधार येथे नेण्यात आले. यावेळी, प्रवाशांना दहशतवाद्यांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी भारत सरकारला अतिशय खतरनाक तीन दहशतवाद्यांना मुक्त करावे लागले होते.  मुक्त झालेल्या दहशतवाद्यांमध्ये मुश्ताक अहमद जरगर, अहमद उमर सईद शेख आणि मौलाना मसूद अझर यांचा समावेश आहे. जसवंतसिंग स्वत: त्यांना कंधारला घेऊन गेले होते.  उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार

२०१२ मध्ये एनडीएतर्फे जसवंत सिंग यांना उपराष्ट्रपती  पदासाठी उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी युपीएचे उमेदवार हमीद अन्सारी यांच्या विरोधात निवडणूक लढविली. तथापि, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

का काढून टाकले होते पक्षातून?

जवाहरलाल नेहरूंचे केंद्रीकृत राजकारण हे फाळणीस जबाबदार होते असा दावा जसवंत सिंह यांनी लिहिलेल्या ‘जिन्नाह: इंडिया-पार्टिशन-इंडिपेंडेंस’ या पुस्तकात करण्यात आला. त्यामुळे ते जसवंत सिंग वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. जसवंत यांनी आपल्या पुस्तकात मोहम्मद अली जिन्ना यांचे कौतुक केले आहे. यानंतर भाजपने त्यांना पक्षातून काढून टाकले.

तथापि, २०१० मध्ये त्यांना पुन्हा भाजपमध्ये स्थान देण्यात आले.  2014 मध्ये भाजपाने त्यांना लोकसभेचे तिकीट दिले नाही. भाजपने त्यांच्या बाडमेरच्या जागेसाठी कर्नल सोनाराम चौधरी यांना उमेदवारी दिली. त्यानंतर जसवंत सिंह यांनी पक्षाला रामराम ठोकला आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढविली, परंतु ते पराभूत झाले

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *