मनसेच्या पाठिंब्यामुळे मोहोळांचे मताधीक्क्य वाढणार

The support of MNS will increase the electoral dominance of Mohols
The support of MNS will increase the electoral dominance of Mohols

पुणे– महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला शिवतीर्थावरुन दिलेल्या  बिनशर्त पाठिंब्यामुळे पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची ताकद वाढली असून त्यांच्या मताधीक्क्यात वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. 

राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे, मुंबई, नाशिक जिल्ह्यात मनसेची मोठी ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी हा पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर राज यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर  केले. पुण्यामध्ये मनसेचे चांगले काम आहे. मानसेचाही एक मोठा मतदार वर्ग पुण्यात आहे. मनसेला नुकताच रामराम ठोकलेले मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे वंचित कडून रिंगणात उतरले आहेत. त्यांचा पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर रोष आहे. त्यांनी एकतर्फी निवडणूक कशी होती ते बघतो असे आव्हान दिले आहे. मात्र, आता मनसेने महायुतीला पाठिंबा जाहीर केल्याने मोरे यांच्या विरोधातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणखी जोमाने काम करतील. या सर्व गोष्टींचा  आपसूकच फायदा मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढण्यात होणार आहे.

अधिक वाचा  मनसे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी घेणार मेळावे - राजेंद्र वागस्कर

मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया

दरम्यान, राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला शिवतीर्थावरुन दिलेला बिनशर्त पाठिंबा, हा त्यांच्या देशाच्या विकासाबद्दल असलेला सच्चेपणा अधोरेखित करतो. हिंदू नववर्षाच्या शुभदिनी केलेल्या या घोषणेमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांना निश्तितच बळ मिळाले आहे. पुणे लोकसभा निडणुकीतही मनसैनिकांना सोबत घेऊन आम्ही एकदिलाने या निवडणुकीला सामोरे जाऊ आणि मोठ्या मताधिक्याने जिंकू, हा विश्वास वाटतो”, अशी प्रतिक्रिया पुणे लोकसभा माहायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love