पुणे- देशाचे माजी लष्कर प्रमुख विद्यमान केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी स्वतःच् ‘अग्नीपथ’ नावे केल्या जाणाऱ्या लष्कर-भरतीच्या ‘कंत्राटी पध्दती’ बाबत’ आपणा स्वतःस देखील कणभर माहीती नसल्याचे विधान” नुकतेच केले होते. परंतु, दुर्दैवाने त्याच ‘माजी लष्कर प्रमुखांना’ आज मात्र ‘पिंजऱ्यातल्या पोपटा’ प्रमाणे विधाने करावी लागतात, हेच देशाचे दुर्दैव असुन मोदी – शहांचे सरकार ‘माजी लष्करी प्रमुखास’ देखील कशा पध्दतीने ‘कठपुतली’ प्रमाणे वापरत आहे, हे सारा देश पहात आहे अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे. ही लोकशाहीची विटंबना असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
तिवारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मोदी – शहांचे सरकार माजी लष्कर प्रमुखांना’ मंत्रीपदाच्या उपकाराखाली विरोधकांवर बेछुट आरोप करणारी विधाने करायला लावत आहे.. ती विधाने करतांना सिंगांच्या हे देखील लक्षात नाही की, ‘सेना भरती’कडे आयुष्यभराचे करीअर म्हणून पाहणाऱ्या व भरती होण्यासाठी डोळे लावून बसलेल्या व त्याकरीता रात्रंदिवस तयारी करणाऱ्या तरूणांच्या अपेक्षेवर (अग्नीपथ मुळे) पाणी पडल्यामुळेच् ते सर्व तरूण प्रचंड अस्वस्थ झाल्याने हा आगडोंब ऊसळला. विशेष म्हणजे ही आंदोलने प्रामुख्याने भाजप सत्तेत असलेल्या राज्यात होत असल्यामुळे, ‘विरोधकांनी चिथावणी देण्याचा’ प्रश्नच ऊदभवत नाही.
वास्तविक ‘अग्रीपथ’ची कंत्राटी भरती योजनाच मुळी अचानक जाहीर केली. त्यामुळे काँग्रेस’सह इतर विरोधी पक्षांनी या योजनेच्या गंभीर परीणामांची भयानकता समोर आल्यानंतरच् भूमिका जाहीर केली. तत्पुर्वी तरूणांची आंदोलने सुरू देखील झाली होती. भारतीय सेनेची प्रतिष्ठा व गरीमा महत्वाची असुन, विरोधासाठी विरोध करणे ही काँग्रेसची संस्कृती नाही.. त्यामुळे श्री सिंग यांचे ‘विरोधकांवर तरूणांना चिथावणीचे आरोप करणे’ बालीशपणाचे असल्याचे सांगून व्ही. के. सिंग यांनी त्यांचा राजकीय वापर होत असल्याचे ध्यानात घ्यावे..
“हजारोंच्या शहीदत्वाने, स्वातंत्र्य लढ्यातुन ऊभारलेल्या स्वयंपुर्ण व प्रगतीकारक” भारतास कोणी सक्तेच्या मक्तेदारीच्या भावनेतून संकटांच्या व पुन्हा पारतंत्र्याच्या खाईत ढकलण्याचे मनसुबे कोणी बघत असतील तर त्यांचे मनसुबे अहिंसेच्या लोकशाहीयुक्त ‘संवैधानिक मार्गाने’ ठेचुन काढण्याची हिंमत काँग्रेस पक्ष बाळगून आहे. याची ऊचीत जाण मोदी-शहांच्या मस्तवाल सत्ताधाऱ्यांनी ठेवावी असा ईशारा देखील गोपाळदादा तिवारी यांनी दिला आहे.