केंद्र व राज्य सरकारने एकमेकांवर टोलवाटोलवी न करता प्रत्येकाने आपापले काम करावे- अजित पवार


पुणे- राज्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत असल्याने आरोग्य व्यवस्थेवरचा ताण  वाढला आहे. तर दुसरीकडे लसिकरणाच्या मोहिमेला लसीच्या तुटवड्यामुळे खीळ बसल्याची परिस्थिति पुणे जिल्ह्यात निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत एकमेकांची उनिदुनि काढत आहेत. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सामंजस्याची भूमिका घेतली आहे. “कोरोनाची साखळी तोडणं हे महत्वाचे असून, केंद्र आणि राज्य सरकारने एकमेकांवर टोलवाटोलवी न करता प्रत्येकाने आपापले काम करावे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पुण्याचे महापौर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

पवार म्हणाले, मलाही कळतंय की केले अनेक दिवस हे काम सुरु आहे. सहनशीलता संपतेय. पण सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करावे. तरच कोरोनाची साखळी तोडता येईल. एकमेकांवर टीका व राजकारण न करता प्रत्येकाने आपापले काम करावे. केंद्राने हे केलं नाही असं आम्ही म्हणायचं आणि त्यांनी म्हणायचं की आम्ही देतो, असे  न करता कोरोना विरुद्धच्या लढाईत सर्वांनी आपापले काम करणं गरजेचं आहे.

अधिक वाचा  हा तर फक्त स्वल्पविराम : काहीही झाले तरी भाजपला अजित पवार का हवे आहेत?

दरम्यान, यावेळी अजित पवार यांनी जनतेला काळजी घेण्याचं देखील आवाहन केलं आहे. “पहिल्या लाटेपेक्षा आता कितीतरी जास्त सुविधा आपल्याकडे झाल्या आहेत. तेव्हा कुणालाच माहिती नव्हतं की त्याचं गांभीर्य किती आहे. सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली. पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर आख्ख्या देशानं त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. मात्र, पहिल्या लाटेमध्ये लोकांमध्ये करोनाची भिती होती. करोना झाला हे सांगायला देखील लोकं घाबरत होती. तशी परिस्थिती आता राहिलेली नाही. एखाद्याला  करोना झाला आणि तो सगळ्यांच्या सहवासात आला, तर तो इतक्या मोठ्या प्रमाणावर बाधित करत नव्हता. पण आता हे बाधित होण्याचं प्रमाण वाढलं आहे”, असं ते म्हणाले. ससुन हॅास्पिटल मध्ये ५०० बेड पर्यंत नेण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. ससुनला ॲाक्सिजनसाठी ॲटलस कॉपकोने  मशीन दिलं आहे. अशाप्रमाणे कोरोनाच्या संकटाच्या नियोजनाचा सामना करण्याचा प्रयत्न  करत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  अजित दादांनी मारले एका दगडात दोन पक्षी : पवार घराण्यात कोण जेष्ठ? आणि कोण त्यांच्याबरोबर? याबाबत सांगताना अजित दादांचे सूचक वक्तव्य..

मागणीनुसार लसीचे डोस मिळतील

पुण्यात काही ठिकाणी लसींचा पुरवठा कमी पडल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यावर अजित पवार यांनी प्रकाश जावडेकरांनी लसींचा पुरवठा करण्याचं आश्वासन दिल्याचं सांगितलं. “पुण्यात ५५० लसीकरण केंद्र आहेत. सर्व केंद्रात वेगवेगळ्या प्रमाणात लसीचे डोस असतात. ग्रामीण भाग देखील मोठ्या प्रमाणावर आहे. पण प्रकाश जावडेकरांनी सांगितलं की तुमच्या मागणीनुसार लसींचे डोस पुरवले जातील. जसं सुरुवातीच्या काळात अकोला आणि अमरावतीमध्ये दुसरी लाट आली होती. ती आता बऱ्याच अंशी खाली आली आहे. आपल्याकडे देखील तशाच पद्धतीने नियंत्रण होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत”, असं अजित पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं.

लसीच्या बाबतीत एक लाखाचं टार्गेट ठेवले होते. ८५,००० केले. पण लस कमी पडली. जावडेकरांनी सांगितलं की जितकी लस आवश्यक असेल तितके मिळतील. आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचे केंद्र सरकारतर्फे प्रकाश जावडेकरांनी आश्वासन दिले आहे.

अधिक वाचा  हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांच्यात रंगले 'बॅनर वॉर' : हर्षवर्धन पाटील अपक्ष लढणार?

उद्या पुण्यातुन विभागीय आयुक्त, पोलीस आणि महापालिका आयुक्त व्यापाऱ्यांसोबत बैठक घेणार असून दुकानांबाबतची भूमिका घेतली जाईल, असे पवार यांनी सांगितले.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love