पुणे – स्वातंत्र्योत्तर भारतात प्रत्येकास समान मताचा अधिकार अर्पण करून (स्वातंत्र्य पुर्व काळात प्रजा समजल्या जाणाऱ्या जनतेस) ‘लोकशाहीचा निर्णायक नागरीक’ बनवणारे, स्वतंत्र भारताचे ‘संविधान’ हीच् खरी भारताची ओळख असुन, संविधानाचे मुल्य जपले तरच श्रेष्ठ भारत, नवा भारत, आत्मनिर्भर भारत होऊ शकतो.. अन्यथा केंद्रातील सत्तांधिशांच्या भारता विषयीच्या वल्गना व्यर्थ आहेत असे प्रतिपादन कांग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पर्वती ब्लॅाक काँग्रेस आयेजीत संविधान दिन व २६/११ च्या हुतात्म्यांना श्रध्दांजलीपर कार्यक्रमात बोलतांना केले.
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले ‘राजेशाही व निजामशाहीत’ विखूरलेल्या भारतास, ब्रिटीशांच्या हुकुमशाहीच्या जोखडातुन, अहिंसेच्या व सत्याग्रही – आंदोलनात्मक मार्गाने सोडवण्याचे महतपुर्ण कार्य महात्मा गांधी, नेहरू, पटेल, आझाद आदिंनी केले. भगतसिंह – राजगुरूंसह शेकडो स्वातंत्र्य-वीरांच्या बलीदानामुळे, अविरत संघर्षामुळे देशास स्वातंत्र्य मिळाले ही वास्तवता आहे, तर डॅा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे संघराज्य प्रणीत प्रजासत्ताक भारताची ओळख जगासमोर निर्माण झाली हे वास्तव आहे. त्यामुळेच अहिंसेच्या तत्वावर स्वातंत्र्य मिळवून देणाऱे जननायक महात्मा गांधीचे जगभर पुतळे ऊभे रहातात. त्यामुळे ‘भारतिय संविधाना प्रती जागरूक रहाणे भारतीय राज्य-घटनेचे संरक्षण करणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्यच् आहे.
२६/११च्या हल्ल्यात शहीद करकरे, कामठे, साळसकर, ओंबळे आदींच्या हौतात्म्यास न्याय देण्याचे काम देखील भारतीय संविधानाने केले त्यामुळेच अजमल कसाब, अफजल गुरू सारख्या अतिरेकींना न्यायालयाचे मार्गाने फासावर लटकवण्याची प्रक्रिया भारतात होऊ शकते याचा आदर्श देशातील पूर्वीच्या सरकारांनी जगात पोहचवून दहशतवाद-विरोधी संदेश दीला असेही गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले..! ऊपस्थितांचे स्वागत कार्यक्रमाचे संयोजक, पर्वती ब्लॉकचे उपाध्यक्ष व ‘भीमशक्ती संघटना’ पुणे शहराचे विजय हिंगे यांनी केले. ब्लॅाक अध्यक्ष सतिश पवार यांनी प्रास्तावित केले. मराठा महासंघांचे श्री गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला..! या कार्यक्रमास पर्वती मतदारसंघाचे अध्यक्ष सतीश पवार, युवक काँग्रेस सरचिटणीस अक्षय सागर, सौ नंदाताई ढावरे, शंकर साखरे, सुधाकर साबळे, आदित्य साखरे, बालाजी वाघमारे, सुनिल अमृतसागर, प्रशांत गायकवाड ब्लॉक कॉंग्रेस आणि भीमशक्ती संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.