कॉँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल यांचे निधन: का म्हटले जायचे पटेल यांना चाणक्य?


नवी दिल्ली( ऑनलाईन टीम)—भारतीय राजकारणात कॉंग्रेसचे चाणक्य म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते आणि गांधी घराण्याचे विश्वासू अहमद पटेल यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. एका महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना  कोरोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी पहाटे 3.30  वाजता वडील अहमद पटेल यांचे निधन झाल्याचे अहमद पटेल यांचे पुत्र फैसल पटेल यांनी ट्विट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमद पटेल यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. या रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

पटेल यांचा राजकीय आलेख

गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वर येथे जन्मलेले अहमद पटेल हे तीन वेळा (1977,1980 ,19 84) लोकसभा खासदार आणि पाचवेळा (1993,1999, 2005, 2011,2017 पासून आतापर्यंत) राज्यसभेचे खासदार होते. पटेल यांनी 1977 मध्ये भरुच येथून पहिली निवडणूक लढविली होती जी त्यांनी 62,879  मतांनी जिंकली होती. 1980  मध्ये त्यांनी पुन्हा येथून निवडणूक लढवली आणि त्यावेळी त्यांनी 82,844  मतांनी विजय मिळविला होता. 1984 च्या तिसर्‍या लोकसभा निवडणुकीत ते 1,23,069  मतांनी विजयी झाले. त्यानंतर पटेल 1993  पासून राज्यसभेचे खासदार आणि २००१ पासून सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार होते.

अधिक वाचा  सुपारी घेऊन कोणी अशाप्रकारे वक्तव्ये करत असतील तर ते बालिशपणाचे लक्षण : दिलीप वळसे पाटील यांची राज ठाकरे यांच्यावर टीका

तालुकाध्यक्ष ते प्रदेशाध्यक्ष

याशिवाय 197 7 ते 1982  पर्यंत पटेल हे गुजरातच्या युवक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. सप्टेंबर 1983 ते डिसेंबर 1984 पर्यंत ते अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सहसचिव होते. 198 5 मध्ये जानेवारी ते सप्टेंबर या काळात ते पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव होते. त्यांच्याखेरीज अरुण सिंग आणि ऑस्कर फर्नांडिस हे सुद्धा  राजीव गांधी यांचे  संसदीय सचिव होते. सप्टेंबर 1985 ते जानेवारी 1986 पर्यंत पटेल हे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस होते. कॉंग्रेसच्या तालुका पंचायत अध्यक्षपदापासून राजकारणाची सुरुवात करणारे पटेल जानेवारी 1986  मध्ये गुजरात कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले आणि ते ऑक्टोबर 1988 पर्यंतया पदावर  राहिले.1991  मध्ये नरसिंहराव पंतप्रधान झाल्यावर पटेल यांना कॉंग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य बनविण्यात आले होते,  आत्तापर्यंत ते या पदावर होते.

पटेल यांना 1996  मध्ये अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष बनण्यात आले. सीताराम केसरी त्यावेळी कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. तथापि, सोनिया गांधी यांचे खाजगी सचिव व्ही. जॉर्ज यांच्याशी झालेल्या वादानंतर त्यांनी 2000 मध्ये हे पद सोडले आणि पुढच्याच वर्षी ते सोनियाचे राजकीय सल्लागार बनले. संघटनेतील या पदांशिवाय ते नागरी उड्डाण मंत्रालय, मानव संसाधन व पेट्रोलियम मंत्रालयाला मदत करण्यासाठी नेमलेल्या समितीचे सदस्यही होते. 2006 पासून ते वक्फ संयुक्त संसदीय समितीचे सदस्य होते. अहमद पटेल हे गुजरात युवक कॉंग्रेस कमिटीचे सर्वात तरुण अध्यक्ष होते, अहसान जाफरी यांच्या व्यतिरिक्त ते गुजरातमधील दुसरे मुस्लिम होते ज्यांनी गुजरातमध्ये लोकसभा निवडणूक जिंकली होती.   

अधिक वाचा  राजीव सातव यांच्या अंत्ययात्रेत जमलेल्या त्यांच्या जवळच्या 20 नातेवाईकांव्यतिरिक्त अन्य राजकीय आणि सर्वसामान्य नागरिकांवर गुन्हे दाखल करा

पटेल यांच्यामुळे 1977 मध्ये कॉंग्रेसची विश्वासार्हता वाचली

इंदिरा गांधीपासून अहमद कॉंग्रेसमध्ये होते. 1977 च्या निवडणुकीत जेव्हा इंदिराजींनाही फासा फिरण्याची भीती वाटत होती तेव्हा अहमद पटेल यांनीच इंदिरा गांधी यांना आपल्या विधानसभा मतदार संघात सभा घेण्यास भाग पाडले होते. 1977 च्या सार्वत्रिक निवडणुकीत जेव्हा कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला त्यावेळी  गुजरातने कॉँग्रेसची   काही विश्वासार्हता वाचवली होती.  तेव्हा संसदेत पोचलेल्या मूठभर लोकांपैकी अहमद पटेल ही एक होते. 1980 च्या निवडणुकीत जेव्हा इंदिरा गांधी यांना अहमद पटेल यांना मंत्रिमंडळात स्थान द्यायचे होते तेव्हा त्यांनी संघटनेत काम करण्यास प्राधान्य दिले.

मंत्रीपद  नाकारून पक्ष संघटनेच्या कार्याला प्राधान्य प्रथम इंदिरा आणि नंतर राजीव गांधी यांनी सुद्धा 1984 च्या निवडणुकांनंतर अहमद पटेल  यांना मंत्रिपद देण्याची इच्छा होती, पण अहमद यांनी पुन्हा पक्षाची निवड केली. राजीव गांधींच्या काळात त्यांनी युवा कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेटवर्क तयार केले, ज्याचा सर्वात जास्त फायदा सोनिया गांधी यांना झाला. अहमद यांच्यावर टीका करणारे सुद्धा असे म्हणायचे की ही गांधी कुटुंबाशी असलेली त्यांची अतूट निष्ठा आहे, ज्याबाबत शंका घेतली जाऊ शकत नाही. अहमद पटेल यांचे  राजीव गांधी यांच्याशी मतभेदही असू शकतात पण त्यांनी राजीव गांधी यांच्यावर किती प्रेम केले याबद्दल शंका नाही.

अधिक वाचा  शहरी पूर नियंत्रण आराखडा राबविणार- मुरलीधर मोहोळ

कॉँग्रेसचे चाणक्य

अहमद पटेल यांना 10 जनपथचे चाणक्य देखील म्हटले गेले. ते कॉंग्रेस कुटुंबातील गांधी घराण्यातील सर्वात जवळचे आणि गांधीं कुटुंबाच्या नंतर त्यांना ‘नंबर 2’ चे मानले जात असे. अहमद पटेल हे तकडीचे नेते होते. परंतु, त्यांनी स्वत:ला कायम ‘लो प्रोफाइल’ ठेवले. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत शांत आणि  आणि प्रत्येकासाठी गुप्त होते. गांधी घराण्याशिवाय त्यांच्या डोक्यात काय सुरू असायचे हे कोणालाही माहिती नसायचे. पटेल दिल्ली आणि देशातील माध्यमांमध्ये प्रोफाइल न ठेवण्याचा प्रयत्न करीत असत, टीव्ही वाहिन्यांवरून ते कधीच दिसले  नाही, परंतु त्यांच्यावर या वृत्तावर नियंत्रण ठेवल्याचा आरोप करण्यात येत असे. गांधी कुटुंब आणि पंतप्रधानांशी त्यांची सतत बैठक असायची मात्र त्यांच्यासमवेत पटेल यांची अत्यंत निवडक छायाचित्रे आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love