मागील आर्थिक वर्षात भाजपला मिळाल्या कॉँग्रेसपेक्षा सहापट जास्त देणग्या


नवी दिल्ली -सन 2019-20 च्या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) अहवालानुसार, भाजप मालमत्तेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होता, बहुजन समाज पक्ष दुसऱ्या क्रमांकावर तर देशातील सर्वात जुना पक्ष कॉँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याच वेळी, 2020-21 या आर्थिक वर्षात भारतीय जनता पक्षाला 477.5 कोटी रुपयांहून अधिक देणग्या मिळाल्या आहेत, तर देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसला याच कालावधीत 74.50 कोटी रुपयांहून अधिक देणग्या मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसला मिळालेल्या देणग्या हे सत्ताधारी पक्षाला मिळालेल्या पैशाच्या केवळ 15 टक्के आहेत. दुसरीकडे भाजपला काँग्रेसपेक्षा सहापट जास्त देणग्या मिळाल्या आहेत.

निवडणूक आयोगाचा सार्वजनिक अहवाल

मंगळवारी निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना मिळालेल्या देणग्यांचा अहवाल सार्वजनिक केला. या अहवालानुसार भाजपला विविध संस्था, इलेक्टोरल ट्रस्ट आणि व्यक्तींकडून 4,77,54,50,077 रुपये मिळाले. भारतीय जनता पक्षाने यावर्षी १४ मार्च रोजी २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी मिळालेल्या देणग्यांचा तपशील निवडणूक आयोगासमोर सादर केला होता. त्याचवेळी काँग्रेसने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या अहवालानुसार विविध संस्था आणि व्यक्तींकडून ७४,५०,४९,७३१ रुपये मिळाले.

अधिक वाचा  येरवडा भागात एक अत्यंत संतापजनक अन् किळसवाणा प्रकार

2019-20 मध्ये भाजपची संपत्ती 4847 कोटी रुपये होती

आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये, भारतीय जनता पक्षाने (भाजप) 4847 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. देशातील सर्व राजकीय पक्षांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याचवेळी काँग्रेसने आपली संपत्ती ५८८.१६ कोटी असल्याचे जाहीर केले होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love