‘पूर्णम’ करीत असलेले कार्य समाजभान जागृत करणारे


पुणे -पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन करीत असलेल्या कार्यावरून आपल्याला कमी वापर(REDUCE), पुनर्वापर(REUSE)  आणि पुनर्चक्रीकरण (RECYCLE) या त्रिसूत्रीचे  आपल्या जीवनात किती महत्व आहे याची प्रचीती येते. ‘पूर्णम’ करीत असलेले हे कार्य खरोखर समाजभान जागृत करणारे आणि समाजाला दिशा देणारे आहे असे गौरोद्गार जनसेवा बँकेचे अध्यक्ष प्रदीप जगताप यांनी काढले.

शनिवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन या संस्थेचा सहावा वर्धापनदिन समारंभ साजरा करण्यात आला. कोव्हीड-१९ च्या पार्श्वभूमीवर मर्यादित उपस्थितीत सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करून के. बी.जोशी हॉल, कमिन्स इंजिनीयारिंग येथे संपन्न झाला. या सोहळ्यासाठी प्रमुख वक्‍ते म्हणून डॉ. प्रसाद देवधर, चेअरमन, भगीरथ  ग्रामविकास प्रतिष्ठान, झाराप, कुडाळ आणि श्री. प्रदीप जगताप, चेअरमन, जनसेवा बँक हे प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित होते. संस्थेच्या संचालिका सौ. विंदा बाळ यांच्या हस्ते प्रमुख वक्‍ते आणि प्रमुख अतिथी यांचा सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा  महिला पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

प्रमुख पाहुणे जनसेवा बँकेचे अध्यक्ष श्री. प्रदीप जगताप यांनी पूर्णमदवारे राबविल्या जाणाऱ्या इ-कचरा व प्लास्टिक कचरा संकलनाच्या प्रकल्पाविषयी उल्लेख करून कमी वापर(REDUCE), पुनर्वापर(REUSE)  आणि पुनर्चक्रीकरण (RECYCLE) या त्रिसूत्रीचे  आपल्या जीवनातील महत्व सांगितले.  

डॉ. प्रसाद देवधर यांनी कुडाळ येथील भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानदवारे चालविल्या जाणाऱ्या प्रकल्पाविषयी विस्तृत माहिती दिल्री. तसेच गावांमध्ये अधिकाधिक बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारून ग्रामीण महिला व शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या त्यांच्या निर्धारामागची पार्श्वभूमी आणि गरज समजावून सांगितत्री. सुमारे १०० लोकांच्या उपस्थितीत वर्धापनदिन समारंभ संपन्न झाला.

संस्थेदवारे यावर्षी प्रथमच पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी उल्ल्रेखनीय कार्य करणाऱ्या रहिवासी संस्थेला आणि व्यक्‍तीला अनुक्रमे “पर्यावरण हितवर्धिनी” आणि “पर्यावरण मित्र” ह्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. धायरीतील व्यंकटेश शर्विल या रहिवासी संस्थेला “पर्यावरण हितवर्धिनी” या पुरस्काराने आणि वायूमित्रचे संचालक प्रियदर्शन सहस्त्रबुद्धे यांना “पर्यावरण मित्र” या पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच पूर्णमच्या कामामध्ये गेल्या वर्षभरात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या   सुधीर तळवलकर आणि ऋतिक सावंत यांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक आणि सर्वोत्कृष्ट कर्मचारी ह्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

अधिक वाचा  ...म्हणून लतादीदींचा स्वर जगावर अधिराज्य करतो - रामदास फुटाणे

पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन ही संस्था गेली ६ वर्षे कचरा व्यवस्थापन, पर्यावरण आणि शाश्‍वत विकास या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. संस्थेदवारे इ-कचरा व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, जुने कपडे संकलन व पुनर्वापर, सॅनिटरी नॅपकीन डिस्पोजल, ग्रीन कन्सल्टन्सी आणि जनजागृती उपक्रम हे प्रकल्प राबवित्रे जातात. ह्यावेळी सर्व प्रकल्पांची माहिती देणारे स्टॉल मांडण्यात आले होते.   

संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश मणेरीकर यांनी प्रास्ताविकादवारे पूर्णमची आजपर्यंतची वाटचाल आणि भविष्यामधील  नियोजन याबद्दल माहिती दिली. संचालक श्री. सचीन कुलकर्णी यांनी संस्थेच्या पूर्णाहुती या देणगीबद्दबच्या योजनेची आणि पुढील वर्षी सुरु होणाऱ्या पाठ्यवृत्तीच्या योजनेबद्दल माहिती दिल्ली. कार्यक्रमादरम्यान वार्षिक अहवालाचे प्रमुख अतिथी व वकत्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले आणि पूर्णमचे नवीन संकेतस्थळ उद्‌घाटन केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love