एकनाथ खडसेंनी दिला भाजपचा राजीनामा? चंद्रकांत पाटील म्हणतात ..

राजकारण
Spread the love

मुंबई- भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या भाजपला  सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यावरून दररोज नवनवीन चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहेत. घटस्थापनेच्या मुहूर्तावर खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा होती. परंतु, तो फुसका बार ठरला. आता एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करीत राजीनामा दिला  असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, खडसेंनी राजीनामा दिलेला नाही. राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे द्यायचा असतो, माझ्यापर्यंत अद्याप राजीनामा पोहोचलेला नाही. एकनाथ खडसे असे करणार नाहीत, असे पाटील यांनी म्हटल्याचे टीव्ही 9ने म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

 एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे रावेर मतदारसंघातून खासदार आहेत. दुसऱ्यांदा खासदारपद मिळालेल्या रक्षा खडसे यांच्याकडे भाजपने महाराष्ट्र कार्यकारिणीत मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. दुसऱ्या टर्ममध्ये केवळ दीड वर्ष झाल्याने रक्षा खडसे भाजपमध्येच राहतील आणि उर्वरित चार वर्ष पूर्ण करतील, अशी अटकळ बांधली जात असल्याचे  टीव्ही९ ने म्हटले आहे.

कनाथ खडसे 21 तारखेला मुलीसोबत मुंबईत येणार असून, ते काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. एकनाथ खडसे यांच्यासह रोहिणी खडसे-खेवलकर आणि खडसेंच्या संपर्कातील दहा ते पंधरा आमदार राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करतील, असं खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली असल्याचे  टीव्ही९ म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *