..ते म्हणजे महाराष्ट्र नव्हे, कोणाला म्हणाले असे देवेंद्र फडणवीस?


पुणे- कुणाच्या म्हणण्याने कोणी महाराष्ट्रद्रोही होत नाही. भ्रष्टाचार बाहेर काढला की महाराष्ट्रद्रोही, आपल्या अंगावर आले की महाराष्ट्रद्रोही अशी शिवसेनेची गत आहे. परंतु, ते म्हणजे महाराष्ट्र हे शिवसेनेच्या नेत्यांनी समजून घ्यावे असा टोला विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

पुणे पदवीधर मतदारसंघ आणि पुणे विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त फडणवीस पुणे दौर्यावर आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावरील ईडीने छापा टाकल्यानंतर शिवसेनेकडून मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करून खासदार संजय राऊत यांनी मराठी माणसाने महाराष्ट्रात व्यापार उद्योग करणं, हा जर दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल, ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून त्यांना खतम करण्याचं धोरण कोणी राबवत असेल, तर हा मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय देऊन उभा राहील’ असं वाकाताव्य केलं होतं. याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, भ्रष्टाचार बाहेर काढला की आम्ही देशद्रोही होतो. परंतु, आमचे  सरकार पाच वर्षे सत्तेत असताना आम्ही राज्य एक नंबरवर नेले. गुजरातपेक्षा जास्त विदेशी गुंतवणूक आणि उद्योग महाराष्ट्रात आले. आम्हालाही राज्याच्या अस्मितेचे भान आहे. केवळ आपण म्हणजेच महाराष्ट्र असे शिवसेनेच्या नेत्यांनी समजू नये असा टोला त्यांनी लगावला.

अधिक वाचा  मोदीजींची गॅरेंटी म्हणजे, गॅरेंटी पूर्ण होण्याची गॅरेंटी : भाजपाच्या संकल्पपत्रावर मोहोळ यांची प्रतिक्रिया

दरम्यान, प्रताप सरनाईक यांच्या घरावरील ईडीच्या छाप्याबाबत बोलताना ते म्हणाले, ईडीकडे जे पुरावे होते त्याच्या आधारे त्यांनी हा छापा टाकला. परताप सरनाईक यांनी त्यावेळी एजन्सी समोर जाऊन त्यांची बाजू मांडणे आवश्यक होते. ते सोडून ते सामन्याच्या कार्यालयात गेले आणि तिथे मुलाकःत देत बसले. एजन्सीकडे जेव्हा पुरावे असतात तेव्हाच ते कारवाई करतात असे त्यांनी नमूद केले.

पुणे पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुण्यात आले असताना त्यांनी पुण्यात भाजपने १०० पेक्षा जास्त बोगस पदवीधरांची नाव नोंदणी केल्याचा आरोप केला होता. त्याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, ‘चला म्हणजे जयवंतरावांनी पराभव मान्य केला आहे. या निवडणुकीत ईव्हीएम यंत्रावर खापर फोडता येणार नाही म्हटल्यावर जयंत पाटील यांनी बोगस पदवीधर मतदार नोंदणीचा मुद्दा उकरून काढला आहे. नोंदणीची प्रक्रिया एवढी क्लिष्ट आहे की बोगस नोंदणी कशी करता येणार असा सवालही त्यांनी केला. आपण निवडणूक हरणार, याची जाणीव असल्याचे त्यांनी आतापासूनच कव्हर फायरिंग सुरु केली आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

अधिक वाचा  एससी,एसटीच्या आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करा-केशव उपाध्ये

महाविकास आघाडीच्या सरकार विरोधात असंतोष आहे. त्यांच्या एकमेकातील कुरघोडीच्या राजकारणामध्ये जनता भरडली जात आहे. या सरकारची कुठलीही उपलब्धी नाही, कोरोनाच्या विविध कामांमध्ये, खरेदीमध्ये झालेला भ्रष्टाचार पुढे येत आहे.  त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत पदवीधर आपला रोष मतदानातून व्यक्त करतील आणि पुणे पदवीधर मतदार संघातून  भाजपचे संग्राम देशमुख हे पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्यापुरता का होईना, पण भाजपच्या आंदोलनाची दखल घेतली, याचा आनंद  असल्याचा टोलाही फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.  आजपर्यंत आम्ही मुख्यमंत्र्यांना अनेक पत्रं पाठवली, सल्ले दिले. पण यापैकी एका पत्राचीही उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली नाही,  बैठकीला कधी बोलावले नाही, विरोधकांना कधी विश्वासात घेतले नाही असे सांगून फडणवीस म्हणाले, अशाप्रकारे सरकार निर्णय घेताना मनमानी करीत असेल, कोरोना भ्रष्टाचार करत असेल तर जनतेचे दु:ख आंदोलनाच्या मार्फत आम्ही मांडतो आहोत असे ते म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love