Pune Book Festival

पुण्यात पहिल्यांदाच रंगणार पुस्तक महोत्सव : लहान मुले, युवक, पुणेकर असा सर्वांना पुस्तकांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (National Book Trust) वतीने पुण्यात पहिल्यांदाच येत्या १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या (Ferguson College) मैदानावर होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवात (Pune Book Festival) सुमारे २०० स्टॉल्स राहणार असून, पुणेकरांना १० भारतीय भाषांमधील हजारो पुस्तके पाहायला आणि खरेदी करण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. (Book festival will be held for the first time in Pune)

या पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने पुणेकरांना प्रसिद्ध कवी कुमार विश्वास (कुमार Vishwas) , पत्रकार सौरभ द्विवेदी(Saurabh Dwivedi) , ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर(Dr. Raghunath Mashelkar) , लोकगीत गायक नंदेश उमप(Nandesh Umap), प्रसिद्ध लेखक विक्रम संपत (Viram Sampat) यांना ऐकण्याची, तर तुकाराम दर्शन महानाट्य, शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishk Sohla) अनुभवण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर युवकांना काश्मिरी बँड, उत्तर भारतीय संगीताचा आस्वाद घेता येणार असून, टॅलेंट हंटमध्ये दररोज आपल्या कला सादर करता येणार आहे. लहान मुलांसाठी बालसाहित्यिकांकडून कथा, गोष्टी ऐकता येणार आहे.

या पुस्तक महोत्सवाचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ(Savitribai Phule Pune University) , पुणे महापालिका(pmc), उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण विभाग यांनी एकत्रित केले आहे. महोत्सवासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघ सह आयोजक असून, भारतीय विचार साधना आणि खडकी शिक्षण संस्थेचे सहकार्य लाभले आहे. यामध्ये पुस्तक प्रदर्शनाबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, साहित्यिकांच्या मुलाखती, सृजनशिलतेला वाव देणारे आणि वाचन संस्कृतीचा विकास घडविणारे कार्यक्रम खुला रंगमंच आणि अँफी थिएटरमध्ये होणार आहेत. या पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या विविध उपक्रम आणि कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याबाबत शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांना राज्य सरकारने सूचना दिल्या आहेत, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी दिली आहे. पुस्तक न्यासाचे प्रकल्प अधिकारी कांचन शर्मा, एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांची उपस्थिती होती.

या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी १६ डिसेंबरला दुपारी १२ वाजता उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी, सकाळी १०.३० वाजता राजीव तांबे यांचा लहान मुलांसाठी कथाकथन हा कार्यक्रम होणार आहे. उद्घाटनाच्या सत्रानंतर दुपारी ४.३० बँडचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या दिवशी रात्री प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांचा लोकरंग हा सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. या महोत्सवात दररोज दुपारी दीड ते साडेचार या वेळेत राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट हंट उपक्रमाचे आयोजन होणार आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना नृत्य, गायन, वादन अशा विविध प्रकारच्या कला सादर करता येणार आहे. या पुस्तक महोत्सवाची वेळ दररोज सकाळी १०.३० ते ८.३० अशी राहणार आहे. पुण्यातील शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. त्याचप्रमाणे पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन संयोजक राजेश पांडे यांनी केले आहे.

पुस्तक महोत्सव कार्यक्रम पत्रिका

१६ डिसेंबर, शनिवारी

– सकाळी १०.३० – लहान मुलांसाठी कथाकथन कार्यक्रम (खुला मंच) – सादरकर्ते – राजीव तांबे – 

– दुपारी १२ वाजता – उद्घाटन सत्र

– दुपारी १.३० ते ४.३० – टॅलेंट हंट

– दुपारी ४.३० – बँड सादरीकरण

– सायंकाळीं ६.३० – लोकरंग हा सांस्कृतिक कार्यक्रम – सादरकर्ते – नंदेश उमप

……..

१७ डिसेंबर, रविवारी

– सकाळी १०.३० – लहान मुलांसाठी ‘सुट्टी आली, सुट्टी आली ‘ कार्यक्रम – सादरकर्त्या – डॉ. माधवी वैद्य

– दुपारी १.३० ते ४.३० – टॅलेंट हंट

– सायंकाळीं ७.३० – तुकाराम दर्शन महानाट्य

…..

१८ डिसेंबर, सोमवार

– दुपारी ११.३० – प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांचे व्याख्यान

– दुपारी १.३० ते ४.३० – टॅलेंट हंट

– दुपारी ४.३० – प्रसिद्ध पत्रकार सौरभ द्विवेदी यांच्याशी संवाद

– सायंकाळीं ५.३० – प्रसिद्ध लेखक विक्रम संपत यांचे व्याख्यान आणि गप्पा

– सायंकाळीं ७.३० – काश्मिरी बँडचे सादरीकरण

…..

१९ डिसेंबर , मंगळवारी

– सकाळी १०.३० – गाथा शिवरायांची – सादरकर्ते – मोहन शेटे (खुला मंच)

– दुपारी १.३० ते ४.३० – टॅलेंट हंट

– दुपारी ३.३० – स्वातंत्र्यपूर्व काळातील कारागृहात साहित्य निर्मिती करणाऱ्या ५८ स्वातंत्र्यसैनिकांवर ‘ कारागृहातील कल्लोळ ‘ हा  दृक-श्राव्य कार्यक्रम ( अँफी थिएटर )

–  सायंकाळीं ५.३० – हिंदुस्थानच्या फाळणीची शोकांतिका कार्यक्रमात व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची पुस्तकाचे प्रकाशन – हस्ते – सुनील आंबेकर

– सायंकाळीं ६.३० – आर्मी बँडचे सादरीकरण

– सायंकाळीं ७.३० – महाराष्ट्राची संस्कृती

……

२० डिसेंबर, बुधवारी

– सकाळी १०.३० – ओंकार काव्यदर्शन – सादरकर्ते – विसुभाऊ बापट ( आंफी थियटर)

– दुपारी १.३० ते ४.३० – टॅलेंट हंट

– दुपारी १. ३० – वाचणारे अधिकारी अंतर्गत आमचा वाचन कारभार कार्यक्रम – सहभाग – अविनाश धर्माधिकारी, सदानंद दाते, विश्वास पाटील

– सायंकाळीं ५.३० – ज्ञानपीठातील ज्ञानतपस्वी कार्यक्रम ( अँफी थियटर)  – सहभाग – प्रसिद्ध साहित्यिक

– सायंकाळीं ७.३० – इंद्रधनुष्य – सादरकर्ते – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची चमू

…..

२१ डिसेंबर, गुरुवारी

….

– सकाळी १०.३० – व्यंगचित्रे आणि चिंटू ( अँफी थिएटर)  – सादरीकरण – चारुहास पंडित

– दुपारी १.३० ते ४.३० – टॅलेंट हंट

– सायंकाळीं ७.३० – फैजल हा काश्मिरी गीतांचा कार्यक्रम

….

२२ डिसेंबर, शुक्रवारी

– सकाळी १०.३० – कथाकथन ( खुला मंच) – सादरकर्ते – राजीव तांबे

– दुपारी ४.३० – ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी प्रकट मुलाखत ( अँफी थिएटर) मुलाखतकार पत्रकार सागर देशपांडे

–  सायंकाळीं ७.३० – श्रीमंत योगी –  शिवराज्याभषेक महानाट्य -जाणता राजा सादरकर्ते महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठान

….

२३ डिसेंबर , शनिवारी

– दुपारी १.३० ते ४.३० – टॅलेंट हंट

– दुपारी ३.३० – राजकीय नेते काय वाचतात – सहभाग – आशिष शेलार, सतेज पाटील, डॉ. निलम गोऱ्हे, सिद्धार्थ शिरोळे

–  सायंकाळीं ७.३० – मालिनी अवस्थी – उत्तर भारतीय लोकसंगीताचा कार्यक्रम

…..

२४ डिसेंबर, रविवारी

– दुपारी १.३० ते ४.३० – टॅलेंट हंट

– सायंकाळीं ७.३० – कलर्स बँड

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *