श्रीराम मंदिराकरिता खासदार बापट मित्र परिवाराकडून ६५ लाखांचा निधी


पुणे- श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या भव्य मंदिर निर्माण श्रद्धा अभियानासाठी खासदार गिरीश बापट आणि मित्र परिवाराकडून ६५  लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला. हा निधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांचेकडे सुपूर्त करण्यात आला.

आपटे रस्त्यावरील श्रुती मंगल कार्यालयात झालेल्या या अनौपचारिक कार्यक्रमाला भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्क्षा स्वरदा बापट, नगरसेवक उमेश गायकवाड, भाजप शहर चिटणीस सुनील माने, भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रवी देव, माजी नगरसेवक उज्वल केसकर, प्रशांत बधे, अजय भोसले, आर्ट ऑफ लिव्हिंगचे महाराष्ट्र समन्वयक शेखर मुंदडा, ॲडव्होकेट एस. के. जैन, सामाजिक कार्यकर्ते दत्ताजीराव गायकवाड, गौरव बापट, सुधीर साबळे, प्रकाश लोढा, सुरेन्द्र गाडवे, सागर रुकारी, विलास रुकारी, नितीन कोतवाल, एक्सएएल टूल इंडिया लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी ॲलेसांद्रो लाम्ब्रुकी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा  गायिका उत्तरा केळकर, अश्विनी मिठे व गायक विनल देशमुख यांच्या गाण्यांनी पिंपळे गुरवकर मंत्रमुग्ध

यावेळी बोलताना वंजारवाडकर म्हणाले, राम मंदिराच्या निर्माणानंतर देशात राष्ट्रनिर्माणाचे काम सुरू होईल. मंदिर उभा करण्यासाठी प्रत्येक भारतीयाचे योगदान असावे म्हणून देशभरामध्ये घरोघरी जाऊन निधी जमा करण्यात येत आहे. खासदार गिरीश बापट आणि त्यांच्या मित्र परिवाराने यासाठी ६५ लाख रुपयांचा निधी दिला आहे याबद्दल अभिमान वाटतो. एका परिवाराने एकत्र येऊन एका आदर्शासाठी निधी समर्पित करणे ही आनंदाची गोष्ट आहे. या कार्यक्रमाचा दृष्टिकोनच अत्यंत सुंदर आहे त्याचे करावे तितके कौतुक कमी आहे.

खासदार बापट म्हणाले, प्रभू रामचंद्राचे भव्य असे मंदिर आयोध्येत उभा करायचे आहे. हा जगभरात मोठा उपक्रम आहे. या पवित्र कामासाठी प्रत्येकजन आपापल्या परीने मदत करत आहेत. यासाठी एक रुपया देणार ही तितकाच श्रेष्ठ आहे जितका एक कोटी रुपये देणारा. कारण दोघांची ही प्रभू रामाच्या चरणी भक्ति सारखीच आहे. माझ्या मित्र परीवारच्या वतीने ही जात, धर्म, पक्ष या पलीकडे जाऊन मानवतेच्या नात्याने  या उपक्रमासाठी निधी संकलित केला आहे. असा मित्रपरिवार आयुष्यात मला मिळवता आला या बद्दल मला अभिमान आहे. यावरून चांगल्या कामाच्या मागे समाज कायम असतो हे सिद्ध झाले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love