‘सवाई’मध्ये कला सादर करण्याची संधी हे गुरुंचे आशीर्वाद; आनंद, उत्साहासोबतच दडपणही : पहिल्यांचा सादरीकरण करणाऱ्या कलाकारांच्या भावना

PanditBhimsen Joshi Savai Gandharv Mahotsav
PanditBhimsen Joshi Savai Gandharv Mahotsav

पुणे -दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणाने पवित्र झालेले सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासारखे (Savai Gandharv Bhimsen Mahotsav) जागतिक कीर्तीचे व्यासपीठ(A platform of global fame), समोर असणारा जाणकार श्रोतावर्ग (A knowledgeable audience) आणि पहिल्यांदा सादरीकरण करण्याची संधी म्हणजे आमच्या गुरुंचे आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी (Pandit Bhimsen Joshi) यांचे शुभाशिर्वादच आहेत, अशा भावना पहिल्यांदा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात (Savai Gandharv Mahotsav) आपली कला सादर करणाऱ्या कलाकारांनी व्यक्त केल्या. (An opportunity to perform art in ‘Sawai’ is a blessing from the Guru; Along with joy, excitement, pressure)

बुधवार दि १३ डिसेंबर ते रविवार दि १७ डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे आयोजित करण्यात येत असलेल्या ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात सहभागी होण्याची ही संधी म्हणजे आमचे भाग्यच असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

याविषयी बोलताना संगीतमार्तंड पं जसराज यांच्या शिष्या आणि मेवाती घराण्याच्या युवा गायिका अंकिता जोशी म्हणाल्या, “महोत्सवात पहिल्यांदा गायन सादर करताना आनंद, उत्साह दडपण अशा मिश्र भावना आहेत. माझा आनंद हा शब्दांत मांडता येणार नाही. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा माझ्यासाठी नेहमीच खास आहे कारण याच महोत्सवात मला माझे गुरु संगीतमार्तंड पं जसराजजी भेटले. मी मूळची नांदेडची. माझे पहिले गुरु आणि मामा लक्ष्मीकांत रवांदे हे १९९९ साली मला सवाईमध्ये घेऊन आले. गुरुंकडून गाणे शिकण्याची माझी कायमच इच्छा होती. त्या वर्षी ग्रीनरूममध्ये मी संगीतमार्तंड पं जसराज यांना भेटले त्यांनी माझे गाणे ऐकले आणि शिष्य म्हणून त्यांच्या गुरुकुल मध्ये शिकण्याची परवानगी दिली. त्यानंतरचा आयुष्याचा सर्व प्रवास हा शब्दश: कलाटणी देणारा होता. गुरुंकडून आजवर मी अनेक गोष्टी शिकले. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात अनेकदा त्यांना स्वरसाथ करायची संधी मिळाली. त्यामुळे आता याच व्यासपीठावर एकल गायन सादर करणे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. माझे गुरु संगीतमार्तंड पं जसराजजी आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी यांना मी माझे सादरीकरण समर्पित करते.” 

अधिक वाचा  विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेन्द्र अग्रवाल यांना न्यायालयीन कोठडी

मी मूळचा बेळगावमधील कित्तूर या गावाचा असून गुरु पं अनंत तेरदल यांच्याकडे माझे गायनाचे शिक्षण झाले असे सांगत किराणा घराण्याचे युवा कलाकार रजत कुलकर्णी म्हणाले, “सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासारख्या प्रतिष्ठेच्या जागतिक महोत्सवात कला सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी आर्य संगीत प्रसारक मंडळाचा आभारी आहे. पुणेकर रसिकांसमोर सादरीकरण करताना दडपण आहे, मात्र उत्साह आणि आनंदही आहे. पुणेकर श्रोते संगीतप्रेमी आहेत त्यामुळे किराणा घराण्याचे संगीत प्रस्तुत करताना त्यांचे आशीर्वाद मला मिळतील हा विश्वास आहे.”        

माझे आजोबा पं. राम मराठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त यावर्षी मला माझे गाणे सादर करायची संधी मिळत आहे हे मी माझे भाग्य समजते असे सांगत प्राजक्ता मराठे म्हणाल्या, “माझ्या आजोबांनीही सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात सेवाभावाने सादरीकरण केले होते. आजोबांना बघण्याचा अनुभव मला मिळाला नसला तरी त्यांना जो मान सवाईमध्ये मिळाला तोच मला मिळतो आहे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. यावर्षी जन्मशताब्दी निमित्त आजोबा पं राम मराठे आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी यांना आदरांजली वाहण्याची संधी माझ्यासाठी महत्त्वाची आहे.”

अधिक वाचा  वाईन आणि दारू मधला फरक असा आहे : रावसाहेब दानवेंचा अजित पवारांना टोला

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात सादरीकरण करण्याची मला मिळालेली संधी यामुळे मला आनंद तर झाला आहेच शिवाय हे माझे गुरु पं. बबनराव हळदणकर आणि पं विवेक जोशी यांचे आशीर्वाद आहेत असे सांगत पौर्णिमा धुमाळे म्हणाल्या, “माझ्या आग्रा घराण्याची गायकी ही सध्या दुर्मिळ होत चालली असून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात एका मोठ्या, जाणकार श्रोत्यांच्या समूहासमोर मला ती सादर करण्याची मिळत असलेली संधी मोलाची आहे, असे मी मानते. माझी आई सुप्रसिद्ध गायिका डॉ सुलभा ठकार यांकडून मला किराणा घराण्याची तालीम आहेच, त्यामुळे सवाई गंधर्व महोत्सवाशी माझे जवळचे नाते आहे. माझे गुरु पं. बबनराव हळदणकर यांचे गाणे दुर्दैवाने या महोत्सवात होऊ शकले नाही मात्र माझी आईचे १९७३ मध्ये या ठिकाणी सादरीकरण झाले होते. मला मिळालेली कलासादरीकरणाची संधी ही माझ्या गुरुंचे आशीर्वाद आहेत.”     

अधिक वाचा  स्मरण पं. दीनदयाळांचे

कि बोर्ड वादक अभिजित पोहनकर यावेळी बोलताना म्हणाले, “सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या ६९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा कि बोर्ड या वाद्यावर शास्त्रीय संगीत वाजणार आहे ही मोठी बाब आहे. मागील २५ वर्षे मी कि बोर्ड हे वाद्य वाजवत आहे. भारतात, परदेशात मी अनेक कार्यक्रम केले आहे, ज्याला रसिकांची पसंती मिळाली आहे. मात्र शास्त्रीय संगीताची पंढरी मानल्या जाणाऱ्या या महोत्सवात पहिल्यांदा सादरीकरण होत असल्याने या वाद्याला एक मान्यता मिळते आहे ही महत्त्वपूर्ण बाब आहे. माझे बाबा पं डॉ अजय पोहनकर यांनी १९५९ साली सवाई गंधर्व महोत्सवात सादरीकरण केले होते आता त्यानंतर या वर्षी त्यांचे सादरीकरण आणि माझे वादन ही आमच्यासाठी पर्वणीच असणार आहे. पुणेकरांसमोर हे सादरीकरण होणे ही बाब देखील आमच्यासाठी स्पेशल आहे.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love