भाजपच्या नेत्यांनी आग लावण्याचे धंदे बंद करावेत – सचिन सावंत


पुणे- मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात गेला आहे मात्र, या मुद्द्यावरून राजकीय गदारोळ सुरूच आहे. कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी आता मराठा आरक्षणावरून भाजपवर निशाना साधला आहे. मोदी सरकारच मराठा आरक्षणाला अनुकूल नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे तर राज्यातील महाविकास आघाडी सरकारची भाजप नाहक बदनामी करत असून भाजपच्या नेत्यांनी आग लावण्याचे आणि लोकांना फीतवण्याचे धंदे बंद करावेत असे त्यांनी ठणकावले आहे.

पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सावंत यांनी भाजपवर टीका केली. फडणवीस सरकारला मराठा आरक्षणाच्या बाबतीत आम्ही एकमताने पाठींबा दिला होता. परंतु, त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नव्हते. आता संधिसाधू भाजप महाविकास आघाडी सरकारची विनाकारण बदनामी करत आहे.   राज्य सरकार लढत असलेल्या न्यायलयीन लढाईमुळे भाजपच्या पोटात दुखत आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत मोदी सरकार कुठलीही भूमिका स्पष्ट सांगत नाहीये. खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नाच्या बाबतीत तीन पत्रे पाठवली परंतु, त्याला उत्तर नाही, त्यामुळे मोदी सरकार मराठा आरक्षणाला अनुकूल नसल्याची  टीका सावंत यांनी केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  The unprecedented success story of the Rashtriya Swayamsevak Sangh : शंभर वर्षांचा ऐतिहासिक प्रवास: राष्ट्रप्रेमाच्या मार्गावरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विरुद्ध नकारात्मकतेने ग्रासलेला कम्युनिस्ट पक्ष