बंडातात्या कराडकरांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन : बंडातात्यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

राजकारण
Spread the love

पुणे–राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांची मुले दारु पितात असं वक्तव्य कीर्तनकार बंडातात्या यांनी साताऱ्यात केलं होतं. त्या वक्तव्याचा निषेध करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यात आंदोलन केले.हे निषेध आंदोलन पुण्यात संत ज्ञानेश्वर पादुका चौक येथे करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळीबंडातात्या यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी कडून निषेध करण्यात आला.

हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात करण्यात आले.या आंदोलनाला राष्ट्रवादीचे नेत्या रूपाली पाटील ठोंबरे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस महिला अध्यक्ष सीमा सातपुते, पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक व पुणे शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, दारुबाबत केलेल्या वक्तव्यावर कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली आहे. तरीही त्यांनी आमच्या पक्षाच्या प्रमुख नेत्या सुप्रिया सुळे यांची मुले दारू पितात असे वक्त्यव केले आहे. ते एकदम चुकीचे आहे. बंडातात्या कराडकर हे कीर्तनकार आहेत. त्यांनी एखादे वक्तव्य बोलताना विचार करावा. बंडातात्या कराड यांनी सुप्रिया सुळे याची माफी मागितली पाहिजे. नाहीतर आम्ही बंडातात्या कराड यांना शांत बसून देणार नाही. असा इशारा रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिला

प्रशांत जगताप म्हणाले, कीर्तनकार हे काहीतरी वक्तव्य बोलून धोक्यात येत आहेत. आज आम्ही त्यांनी सुप्रिया सुळे यांची माफी मागावी यासाठी आज आम्ही आंदोलन करत आहोत.

दरम्यान, कराडकर यांनी त्यांनी सुप्रिया सुळे तसेच पंकजा मुंडे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. या महिलांबद्दल मला कोणताही वैयक्तिक आकस नाही. माझ्याकडून ते वक्तव्य अनावधानाने निघाले. मी त्याबद्दल माफी मागतो. तसेच कोणाच्या भावना दुखावल्या तर दिलगिरी व्यक्त करतो, असे बंडातात्या कराडकर म्हणाले आहेत.

पुणे न्यायालयात गुन्हा दाखल

दरम्यान, पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी बंडातात्या कराड यांच्याविरोधात पुणे न्यायालयात पहिला खटला दाखल केला आहे. रुपाली ठोंबरे यांनी वकिलामार्फत बंडातात्यांविरुद्ध पुणेच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे खटला दाखल केला. या प्रकरणी न्यायालयाने दखल घेऊन आरोपींवर कडक शासन करावे, अशी मागणी करण्यात आली.

या प्रकरणात रुपाली ठोंबरे यांच्यावतीने अॅड विजयसिंह ठोंबरे, अॅड हितेश सोनार, ॲड दिग्विजयसिंह ठोंबरे व विष्णू होगे काम पाहत आहे. अॅड विजयसिंह ठोंबरे म्हणाले, “आज पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात सातारा येथील बंडुतात्या कराडकर यांनी राजकीय महिलांविषयी दिलेल्या वादग्रस्त आणि बदनामीकारक विधान केलं होतं. त्याविरोधात आज न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला आहे. माझ्या पक्षकार रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीवरून आम्ही मानहानी आणि बदनामीचा फौजदारी खटला दाखल केला आहे.”

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *